भाजपने वंजारी समाजातील कराड यांना केंद्रीय मंत्री केलं धनगर समाजातील पडळकर यांना राज्यसभेवर घेऊन मंत्री करावे – संतोष बिचुकले
भाजपने धनगर समाजावर फक्त पुतना मावशीचे प्रेम करत नाही तर धनगर समाजासाठी काम करतोय हे सिद्ध करण्यासाठी गोपीचंद पडळकर यांना केंद्रीय मंत्री करावे अशी त्यांनी थेट मागणी केली आहे.
धनगर आरक्षण मेंढपाळ भटक्या विमुक्त जाती जमाती ओबीसी आरक्षण चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते संतोष बिचुकले यांनी भाजपला आव्हान केले आहे की तुम्ही वंजारी समाजाची ताकद ओळखून भागवत कराड यांना केंद्रीय मंत्री केले तसे धनगर समाजाची गरज जर तुम्हाला असेल तर आमदार गोपीचंद पडळकर यांचा महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी वापर करण्यापेक्षा गोपीचंद पडळकर यांना राज्यसभेवर घेऊन केंद्रीय मंत्री करावे ही मागणी त्यांनी केली आहे. गोपीचंद पडळकर संतोष बिचुकले यांचा धनगर आरक्षण साठीच राजकीय-सामाजिक बाद संपूर्ण महाराष्ट्र जाणून आहे. पडळकर आणि बिचुकले दोघेही राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब यांच्या पठडीत तयार झालेले आहे. बिचुकले पडळकर यांचा वाद धनगर आरक्षण आणि अखेरच्या लढ्यात संदर्भात आहे व त्याचे प्रतिसाद सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. आमच्या प्रतिनिधीने संतोष बिचुकले यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले गोपीचंद पडळकर आणि माझा वाद हा फक्त धनगर आरक्षणाच्या संदर्भात आहे. भाजप असो किंवा महाविकास आघाडी असो यांनी धनगर समाजाचा वापर फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी केलेला आहे. धनगर समाजाच्या . ज्याप्रमाणे वंजारी समाजाची आरक्षणाच्या बाबतीत दोन्ही पक्ष पॉझिटिव्ह नाहीत. ज्यानां मंत्री पद दिले तसेच जर भाजपला धनगर समाजाचा कळवळा असेल तर मोजाची ताकद ओळखून भाजपने भागवत कराड यांना केंद्रीय (पडळकर यांना महाराष्ट्रात फक्त जातीय तेढ निर्माण करण्यासाठी वापर करण्यापेक्षा त्यांना राज्यसभेवर घेऊन केंद्रीय मंत्री करावे. भाजपने धनगर समाजावर फक्त पुतना मावशीचे प्रेम करत नाही तर धनगर समाजासाठी काम करतोय हे सिद्ध करण्यासाठी गोपीचंद पडळकर यांना केंद्रीय मंत्री करावे अशी त्यांनी थेट मागणी केली आहे. राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नसते अशक्य असते तर महाविकास आघाडीचे सरकार या राज्यांमध्ये दिसले नसत. तसेच संतोष बिचुकले यांनी आपले मत व्यक्त करताना ही ठाम भूमिका मांडली गोपीचंद आणि माझा वाद हा धनगर आरक्षण अखेरचा लढा या गोष्टीतच आहे. बाकीचे इतर राजकीय वक्तव्य करत असतील त्याला माझा विरोध असण्याचं कारण नाही. भविष्यात जो पक्ष आणि नेता धनगर आरक्षण आणि मेंढपाळांच्या संदर्भात आक्रमक भूमिका घेईल त्या नेतृत्वाच्या पाठीमागे उभे राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं. माझा लढा ओबीसी भटके विमुक्त धनगर आणि मेंढपाळ बांधवांसाठी कायमस्वरूपी राहील मला कोणत्याही पक्षाची अपेक्षा आहे ना कोणत्या पदाची अपेक्षा आहे पण मी नेहमीच माझा मेंढपाळ बांधवांसाठी अठरापगड जातीसाठी लढत राहणार आहे आणि लढत राहील.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा