आपल खान्देशब्रेकिंग

वैतरणा धरण परिसरात पाचोऱ्यातील एका युवकांचा दुर्दैवी मृत्यू; ‘ती’ सफर अखेरची ठरली.!

भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि मृतांच्या पाचोऱ्यात शोककळा पसरली आहे.

Nashik News: निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर काळाने घाला घातला आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वैतरणा धरण परिसरात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या भीषण दुर्घटनेतील विरेंद्र नंदन पाटील (रा. पाचोरा, जि. जळगाव) व आदित्य प्रमोद वानरे (वय २०, रा. नांदुरा, जि. बुलढाणा) हे दोघे तरुण पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. हे दोन्ही तरुण आपल्या मित्रांसोबत सुटीचा आनंद घेण्यासाठी येथे आले होते, मात्र या आनंदाचे रूपांतर काही क्षणातच दु:खात झाले.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीच्या वैतरणा धरणालगत असलेल्या धबधब्याखाली चार मित्र पाण्यात उतरले होते. मात्र पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यानं एक जण वाहून गेला. मात्र, त्याला वाचवण्याचा प्रयत्नात दुसराही बुडाल्याची माहिती समोर आली असून, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक घोटी पोलीस ठाण्याचे पथक रवाना झाले एनडीआरएफच्या (NDRF) मदतीने शोधकार्य राबवले आणि त्यांचा मृतदेह बाहेर काढला असून, ​स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. सध्या एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बुडालेल्या तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी शोधमोहीम वेगाने राबविल्याने मृतदेह काढण्यात आले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच धरण क्षेत्रात अशा प्रकारे जीव गमवावा लागल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे