आपल खान्देशकृषीवार्ता

ज्वारी खरेदीचा प्रश्न सोडविल्याने शेतकऱ्यांना दिलासा आ. किशोर पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती

राज्यातील शेतकऱ्यांसमोर गेल्या महिनाभरापासून ज्वारी खरेदीचा प्रश्न होता तो प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दखल घेत सोडविल्याने खऱ्या अर्थाने राज्यातल्या ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळाला असल्याची माहिती आ. किशोर आप्पा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेत प्रांताधिकारी भूषण अहिरे, नायब तहसीलदार विनोद कुमावत, तहसीलदार शीतल सोलाट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, सचिव बी.बी. बोरुडे, शेतकी संघाचे चेअरमन आणि मॅनेजर आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना आ. किशोर पाटील यांनी, ज्वारी खरेदी संदर्भात सर्व पद्धतीने व्यवस्था झाली आहे. दि.१८ जुलैपासून पाचोरा आणि भडगाव येथे ज्वारी खरेदीला सुरवात होणार आहे. खरेदीची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत आहे. जवळपास दीड महिना खरेदीसाठी असून २० ते २२००० पर्यंतची नोंदणी पाचोरा आणि भडगाव दोन्ही मतदार संघातील तालुक्यांमध्ये झालेली आहे. ही खरेदी सुरळीत करण्यासाठी तहसीलदार आणि शेतकी संघ या दोघांनाही सूचना देण्यात आल्याचे सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे