आपल खान्देशमहाराष्ट्र

पाचोरा live – जिथे चहा विकला, तिथेच फौजदार PSI वर्दीतला सिंघंम चमकला

पाचोऱ्यातुनच ट्रेनिंग पिरियड मधून ड्युटी व जनतेची सेवेची सुरवात श्रीगणेशा

पाचोरा येथील, माळी समाजातील पेरकर परिवारासाठी 10 सप्टेंबर 2021, दिवस हा पवित्र गणेश चतुर्थीचा दिवस आज इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद व्हावा असा अविस्मरणीय ठरलेला‌ दिवस आहे तो असा, पाचोऱ्याचे सुपुत्र फौजदार PSI वाल्मिक एकनाथ महाजन साहेब पाचोरा येथे गणपती बाप्पा व म्हसोबा महाराजांच्या कृपाशीर्वादाने श्री गणपती उत्सव निमित्ताने पाचोरा गावी बंदोबस्त करण्यासाठी त्यांच्या माय भुमीत जन्म भुमीत प्रथंम पाचोरा गावी म्हणजे पाचोरा पोलीस स्टेशन जिल्हा जळगाव येथे नाभुतो नाभविष्य महाजन साहेबांना न मागता न बोलता पाचोरा येथे योगायोगाने जनतेची सेवा करण्याची संधी चालुन आली, व बंदोबस्त ड्युटी छत्रपती शिवाजी महाराज चौक पाचोरा जिल्हा जळगाव येथेच मिळाली जिथे चहा विकला तिथेच फौजदार पिएसआय वर्दीतला सिंघंम चमकला, आणि जिथुन चहाच्या स्टाॅल वरती मदत काम करून शिक्षण घेऊन अधिकारी झाले त्याच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या चौकातून जनेतेच्या समोर साहेबांचे मोठे भाऊ जिल्हाध्यक्ष शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली व मोठी बहीण सौ.अंजनाबाई आनंदा महाजन साहेबांचे दोघे भाऊ बहीणींनी व त्यांच्याच्या पुर्ण परिवाराने सर्व संत महापुरूषांच्या कृपेने व बहुजन समाजाच्या माळी समाजाच्या आशीर्वादाने हा सत्यचा इतिहास घडवून लहान भावला अठराविश्व दारीद्रीतून पि.एस.आय.सिंघंम साहेब अधिकारी पदापर्यंत पोहोचवले आज भगवंताने त्यांचे सत्य काम सत्य कर्तव्य केलेले जन्म भुमीतच पाचोऱ्याच्या जनते समोर परमेश्वराने आदर्श डोळ्यासमोर आणून ठेवले आणि महाजन साहेबांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात चहाचा स्टॉल संत श्री सावता महाराज टी स्टॉल चा मागील परस्थितिचा आढावा जानुन घेऊन फौजदार पिएसआय श्री वाल्मिक‌ एकनाथ महाजन साहेबांचे सर्व जनतेतून व बहुजन समाजा कडुन व माळी समाजा कडून कौतुक अभिनंदनाचा वर्षाव जोरदार मोठ्या उत्साहाने होत आहे महाजन साहेब हे जिल्हाध्यक्ष शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली पाचोरा जिल्हा जळगाव यांचे लहान बंधू आहेत ही माऊलींच्या हातुन भगवंताने करून घेतलेली सत्य कामांची पावती आज आपल्याला पुर्ण पाचोऱ्या शहरातून पुर्ण पोलीस कर्मचारी स्टाफ सोबत घेऊन गस्त घालत असतानाचे फोटो डोळ्याने समक्ष फोटो चित्रफीत मधून आपल्याला आज पाह्याला मिळत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे