आपल खान्देश

Kusumba News | अपघातग्रस्त अनिल वाणी यांना समाजबांधवांचा मदतीचा हात; ₹85 हजारांची आर्थिक मदत सुपूर्द..

 

कुसुंबा (धुळे) प्रतिनिधी  धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथील गरीब कुटुंबातील रहिवासी अनिल वाणी यांचा दि. 20 मे 2026 रोजी कुसुंबा-धुळे महामार्गावर भीषण अपघात झाला होता. एका अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली होती. या अपघातानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती.

ईश्वराच्या कृपेने तसेच वैद्यकीय उपचारांमुळे अनिल वाणी हे आठ ते दहा दिवसांनंतर शुद्धीवर आले आणि प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर घरी परतले. त्यांच्या उपचारासाठी लागणारा खर्च भागविण्यासाठी समाजातील अनेक व्हाट्सअपच्या माध्यमातून दानशूर व्यक्ती, मित्रपरिवार व समाजबांधवांनी पुढाकार घेत आर्थिक मदतीचा हात पुढे केला.

समाजबांधवांच्या सहकार्याने एकूण ₹85,255/ इतकी रक्कम जमा करण्यात आली. ही मदत अनिल वाणी यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांसमोर धनादेशाच्या स्वरूपात सुपूर्द करण्यात आली. मदतीची रक्कम स्वीकारताना कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. यावेळी त्यांनी सर्व मदतकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

याप्रसंगी उपस्थितांनी सांगितले की, सुखाच्या क्षणी अनेक जण सहभागी होतात; मात्र दुःखाच्या काळात मदतीसाठी धावून येणारे मोजकेच असतात. अशा कठीण प्रसंगी मदतीचा हात देणाऱ्या सर्व दानशूर बांधवांचे आणि हितचिंतकांचे विशेष कौतुक होत आहे.

समाजातील एकोपा, माणुसकी आणि परस्पर सहकार्याचे हे प्रेरणादायी उदाहरण असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे