पाचोरा : न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

पाचोरा, प्रतिनिधी जयकिरण प्रभाजी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल येथे नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची सुरुवात सोमवार, दि. १५ जून २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे आनंदी आणि स्वागतार्ह वातावरणात पुष्पगुच्छ, शुभेच्छा व विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने शाळा प्रशासनाने सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना शुभेच्छा देत विद्यार्थ्यांनी नियमितपणे शाळेत उपस्थित राहून शिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. शाळेच्या परिसराची स्वच्छता, वर्गखोल्यांची आकर्षक सजावट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच इतर मूलभूत सुविधांची योग्य तयारी करण्यात आली होती.
शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन विद्यार्थ्यांना शाळेची नियमावली, विविध शैक्षणिक उपक्रम, उपलब्ध सुविधा आणि शाळेची कार्यपद्धती यांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत उत्सुकता निर्माण व्हावी यासाठी विशेष स्वागत उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी वर्षात शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांचे व्यापक नियोजन करण्यात आले असून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, शिस्त आणि सामाजिक जाणीव विकसित करण्यावर भर दिला जाणार असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकांना विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पाठविण्याचे तसेच आवश्यक शैक्षणिक साहित्य व गणवेशासह उपस्थित राहण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी शिस्त, नियमितता आणि परिश्रम यांच्या बळावर शैक्षणिक यश संपादन करून शाळेचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसलेला उत्साह आणि आनंद शाळेच्या वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा ठरला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोथरा, उपाध्यक्षा गौरी कुलकर्णी, सचिव जीवन जैन, सहसचिव संजय बडोला, खजिनदार जगदीश खिलोशिया, स्कूल कमिटी चेअरमन लालचंद केसवाणी, स्कूल कमिटी सचिव रितेश ललवाणी, संचालक संजय चोरडीया, गुलाब राठोड प्रभुलाल शर्मा, गोपाल पटवारी, प्रिती जैन, संगिता बोथरा, महेंद्रकुमार हिरण, अशोककुमार मोर, शेखरकुमार धाडीवाल यांच्या आदेशाने तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील व सीईओ अतुल चित्ते सर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मला पाटील, प्रतिभा मोरे, रुपाली जाधव, प्रिती शर्मा, पुजा पाटील, ज्योती बडगुजर, कविता जोशी, अश्विनी पाटील
भाग्यश्री ब्राम्हणकर, विद्या थेपडे, शितल महाजन, स्मिता देशमुख, किशोरी साळुंखे, वाल्मिक शिंदे, किरण बोरसे, शालिनी महाजन, रुक्मिणी कासार, मंदास्मिता पाटील, उज्वला पाटील, हर्षा वाधवा, सानिका पाटील, निवृत्ती तांदळे, कृष्णा शिरसाठ, आनंद दायमा, मनोज बडगुजर, सुनिता शिंपी, शितल पाटील, उज्वला गायकवाड,शिवाजी पाटील, विकास मोरे या सर्वांच्या अथक परिश्रमाने हा नवीन शैक्षणिक वर्षाचा १ ला दिवस आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला.


