आपल खान्देशब्रेकिंग

पाचोऱ्यात चोरीच्या घटनांची मालिका; अमृतेश्वर महादेव मंदिरात चोरीचा अयशस्वी प्रयत्न

 

पाचोरा प्रतिनिधी | शहरात चोरीच्या घटनांची मालिका सुरू असतानाच आता धार्मिक स्थळांनाही भुरट्या चोरांनी लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. पाचोरा येथील अमृतेश्वर महादेव मंदिरातअज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी चोरीचा प्रयत्न केला.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील भडगाव रोड वरील अमृतनगर परिसरातील अमृतेश्वर मंदिरात मंगळवारी दिनांक 17 जुन रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास भाविक पूजाअर्चा करण्यासाठी मंदिरात गेले असता असे निदर्शनास आले की, चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडलेला दिसून आला आणि मंदिर परिसरात ठेवलेल्या एका पैशांच्या पेटीचे कुलूपही फोडण्यात आले. मात्र पेटीत कोणतीही रक्कम नसल्याने चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे मंदिराचे कोणतेही मोठे आर्थिक नुकसान झाले नसल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती सकाळी मंदिर व्यवस्थापनाला मिळाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. शहरात वाढत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, पोलिसांनी अशा घटनांवर आळा घालण्यासाठी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सुदैवाने या घटनेत मंदिरातील मूर्ती किंवा अन्य धार्मिक साहित्याचे कोणतेही नुकसान झाले नसून, केवळ पैशांची पेटी फोडण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकारामुळे मंदिर परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे