आपल खान्देशब्रेकिंग

तिकिट नाही तर मतही नाही. फार्म्युला पंढरपुर-मंगळवेढ्यातून सुरु करु.

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक लढायची आहे अन् जिंकायचीही आहे-निवांत कोळेकर

 

 

तिकिट नाही तर मतही नाही. फार्म्युला पंढरपुर-मंगळवेढ्यातून सुरु करु–निवांत कोळेकर सर

बहुजन वर्गास असलेल्या आरक्षणामुळे इथं ग्रामपंचायत, पंचायतसमिती, जिल्हापरिषद, नगरपालिका, काही जागा सहकार संस्थांमध्ये पक्षीय पातळीवरुन किंवा त्यांचे पॅनलमधून तिकिट मिळते.
माझ्या SC,ST बांधवांवर कमी प्रमाणात पण ओबीसी वर्गावर मात्र तिकिटाच्या बाबतीत प्रस्थापित त्यांच्याच सग्यांना संधी देतात.
SC कोट्यातून असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांचे अनुसुचित जाती प्रमाणपत्र बनावट ठरले. असेही होते.

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक लढायची आहे अन् जिंकायचीही आहे.
एकेकाळी सत्ताधारी जमात असलेला बहुजनवर्ग आज सत्तेपासून फार दूरवर फेकला गेला आहे. लोकशाही प्रणाली ही पक्षीय बणली गेली आणि इथल्या प्रस्थापित वर्गाने पाहुणे-रावळे,पाहुणा नसेल तर दूरचा नातेवाईक, दुरचाही नात्यातला नसल्यास जातीचा हा फंडा वापरुन एक दोन वर्गाचीच सर्वाधिक माणसे सभागृहाचे सदस्य बनले.

बहुजन तिकिटापासून पाहुणा-रावळा किंवा जातीचा नसल्याने फार दूर गेला.
यापुढे लढुयात तेही फक्त प्रस्थापित वर्गाविरोधात.

आपली मतदारसंख्या किती?
आपल्याला प्रतिनिधित्व किती?
हि जाणिवजागृती दहा-पंधरा वर्षापुर्वी कमी होती.
आज गावातील सामान्य मतदार म्हणू लागला, संख्येच्या प्रमाणात सदस्यता असायला हवी. एकाच वर्गाची मक्तेदारी चालणार नाही.
नुसता म्हणू लागला असे नाही तर तशी कृती करु लागला.

यावेळी प्रस्थापित पक्षातून बहुजन वर्गास तिकिट नाही दिले गेल्यास सर्वसमावेशक सक्षम बहुजन बांधव निवडणुकित उमेदवारी करुन सर्वांनी एकदिलाने-एकजुटीने निवडुन आणू.
काही जण निवडणूक ही मेजवानीची पर्वणी समजतात. यावेळी ही पर्वणी न समजता ही आपल्या बहुजनाच्या घरची लढाई समजू.
एक वेळ कुणाचे काय न खाता, कुणाचे काय न घेता, कुणाच्या दबावाखाली न येता, बहुजन उमेदवारास निवडणुक कार्यक्रम जाहिर झालेपासून स्वत:हून मीच उमेदवार आहे याप्रणाने कार्य करुन प्रस्थापितांना धक्का देवू. हे धक्कातंत्र पोटनिवडणूकीत सक्सेस जाल्यास पुढील कोणत्याही निवडणुकांच्या प्रश्व आपोआपच सुटतील. असे निवांत कोळेकर सर आमच्या माध्यमाशी बोलले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे