ब्रेकिंग

कुसुंबा गावातील तरुणांच्या पुढाकारातून वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश देत पर्यावरण संवर्धनाचा घेतला संकल्प

 

कुसुंबा, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कुसुंबा (ता. धुळे, जि. धुळे) येथील युवकांनी एकत्र येऊन वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम राबविला. गाव परिसरातील विविध ठिकाणी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण रक्षणासाठी सामूहिक जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली.

यावेळी उपस्थित युवकांनी वृक्षलागवड ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करत “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्यात आला. तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी हिरवाई जपण्याचे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमात गावातील युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. भविष्यातही पर्यावरणपूरक आणि सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. उपस्थित ग्रामस्थांनी तरुणांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी ॲड. योगेश परदेशी, भटू आप्पा चौधरी, पंडित परदेशी, सुनील भाऊ अंबोरे, यशवंत भाऊ वाघ, राहुल परदेशी, अरुण अहिरे, छोटे भराडी, कमलेश परदेशी, राहुल पवार, पंकज अहिरराव, संजय पाटील, गोपाल पाटील, विक्की मोरे, हेमराज कोळी, आकाश भदाणे, शाम चौधरी, शकूर पिंजारी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे