ब्रेकिंग

खडकदेवळा धरण परिसरातील महत्त्वाच्या रस्त्यासाठी आमदारांकडे निधीची मागणी

 

पाचोरा (प्रतिनिधी) विधानसभा मतदारसंघातील खडकदेवळा धरणाच्या झिरो पॉईंटपासून जुने डोंगरगाव ते पोहरी मार्गावरील सुमारे १ ते १.५ किलोमीटर रस्त्याचे काँक्रीटीकरण तसेच नाल्यावर मोरी बांधकामासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडे आमदार निधीतून मंजुरी देण्याची मागणी हरीभाऊ पाटिल यांनी केली.

हा रस्ता पूर्ण झाल्यास पाचोरा तालुक्याचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याशी थेट संपर्क प्रस्थापित होऊन खान्देश व मराठवाडा यांतील अंतर १० ते १५ किलोमीटरने कमी होणार आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रवासाचा वेळ व खर्च वाचण्यास मदत होईल. तसेच व्यापार, शेतीमालाची वाहतूक आणि रोजगाराच्या संधींनाही चालना मिळणार आहे. विशेष म्हणजे या कामासाठी कोणत्याही खाजगी जमिनीचे अधिग्रहण करण्याची आवश्यकता नसल्याने सदर कामास तातडीने मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली आहे.

हा रस्ता पूर्ण झाल्यास पाचोरा तालुक्याचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याशी थेट संपर्क प्रस्थापित होऊन खान्देश व मराठवाडा यांतील अंतर १० ते १५ किलोमीटरने कमी होणार आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रवासाचा वेळ व खर्च वाचण्यास मदत होईल. तसेच व्यापार, शेतीमालाची वाहतूक आणि रोजगाराच्या संधींनाही चालना मिळणार आहे. असे मागणीचे निवेदन देण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे