आपल खान्देशब्रेकिंग

Police Raid On Loadge | ‘राधाकृष्ण’ लॉजवर उघडकीस आला खोलीतील भयानक प्रकार.. तरुण आणि तरुणी आढळून आले

त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावलं..

शहरातील ‘राधाकृष्ण लॉज’वर पोलिसांनी अचानक धाड टाकून एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून, लॉजमधील गैरप्रकारांचा पर्दाफाश झाला आहे.

धुळे शहरातील देवपूर परिसरात असलेल्या ‘एका लॉज’वर देवपूर पोलिसांनी अचानक धाड टाकली. या धाडीनंतर एक भयानक प्रकार उडकीस आलाय. लॉजच्या एका रुममध्ये २० मुलं-मुली असल्याचं आढळून आले. पोलिसांच्या या कारवाईमुळे धक्कादायक बाब समोर आल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडालीय.

काही दिवसांपासून या ठिकाणी बेकायदेशीर आणि संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. स्थानिक नगरसेवक ललित माळी यांनी या अवैध प्रकाराबाबत देवपूर पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत देवपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने अचानक धाड टाकून ही धडक कारवाई केली.

पथकाने लॉजमध्ये धाड टाकली तेव्हा तेथील संतापजनक प्रकार उघडकीस आला. या ठिकाणी मोठ्या संख्येने तरुण आणि तरुणी आढळून आले. पोलिसांनी तात्काळ या तरुण-तरुणींना ताब्यात घेतलं. कारवाईदरम्यान पोलिसांनी सांगितलं की, ताब्यात घेतलेले सर्व मुल-मुली हे २० वर्षांवरील आहेत. भविष्यात त्यांनी अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये पुन्हा सहभाग घेऊ नये आणि त्यांना योग्य समज मिळावी, यासाठी त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावलं. पालकांना योग्य ती समज देऊन या तरुण-तरुणींना सोडण्यात येईल.

गेल्या काही काळापासून देवपूर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात बेकायदेशीर लॉजिंग व्यवसाय तसेच संशयास्पद कॅफेचे जाळे वेगाने पसरत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातोय. या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. अशा बेकायदेशीर लॉज आणि कॅफेवर भविष्यातही कडक कारवाई सुरू ठेवावी, अशी मागणी केली जातेय.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे