आपल खान्देश

पाचोऱ्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..

विशेष प्रतिनिधी

पाचोरा | आपल्या धारदार लेखणीतून आणि खंजिरीच्या कडकडाटातून उपेक्षित, वंचित आणि कष्टकरी वर्गाच्या वेदनांना वाचा फोडणारे थोर समाजसुधारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज पाचोरा शहरांत आदरांजली वाहण्यात येत आहे. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी अण्णाभाऊंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले आहे.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आपल्या शाहिरीने मराठी मनाला जागृत ठेवणारे आणि ‘फकिरा’ सारख्या अजरामर कादंबरीतून वंचितांचे जगणे जगासमोर मांडणारे अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देत आहेत. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज शहरातील साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे नगर परिसरात सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. थोर समाजसुधारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमदार किशोर पाटिल यांच्या प्रमुख उपस्थितीत थोर समाजसुधारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी आमदार किशोर पाटिल यांच्या सह  पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गणेश पाटील, पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, बालाजी ग्रुपचे नंदु पाटील, हरिभाऊ तुकाराम पाटील, बापु हटकर हे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम अध्यक्ष अजय नारायण आल्हाट, सुमित नानां खोतकर, ईश्वर आहिरे, नाना खोतकर, आदित्य आहिरे, दीपक सिरसाठ, विजू सीरसाठ, नितीन नारायण रक्षे, मंगेश चंदनशिवे, भोला रवींद्र चंदनशिवे, भैया बागवान, लक्ष्मण काशिनाथ शिंदे , दीपक सुरेश देवरे, सुनील पाटिल, कुंदन ब्राह्मणे विजू गायकवाड. राजेंद्र चव्हाण, सुरज चांगरे, रुपेश हटकर, सागर मरसाळे, दीपक मारसाळे, सचिन काळुंखे, शेखर शिंदे, विशाल मोहिते, रवि आहिरे यांनी कार्यक्रम यशस्वी केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे