जयश्री काळकर यांचे दीर्घ आजाराने अखेर प्राणज्योत मालवली.

पाचोरा | गेल्या काही महिन्यांपासून दीर्घ आजाराशी झुंज देत असलेल्या दिवंगत जयश्री संतोष काळकर वय (68 वर्ष) यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
दिवंगत जयश्री संतोष काळकर ह्या गेल्या काही महिन्यांपासून आजाराशी झुंज देत होत्या अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली, स्वभावाने शांत व मनमिळाऊ असणाऱ्या दिवंगत जयश्री संतोष काळकर त्यांच्या जाण्याने समाजाने एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व गमावले आहे. अँड किशोर काळकर भाजप जनजातीय प्रदेश संयोजक यांच्या मोठ्या वाहिनी होत्या तसेच पाचोरा गजानन ऑप्टिकलचे संदीप काळकर यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई, व नातवंड आणि नातेवाईक असा मोठा परिवार आहे. त्यांची अंतयात्रा राहत्या घरापासून (तलाठी कॉलनी) निघणार आहे, अंत्यसंस्कार पाचोरा स्मशान भूमी संध्याकाळी सात वाजता करण्यात येणार आहे.



