आपल खान्देशब्रेकिंग

भडगाव तालुक्यात आंबेडकर जयंतीच्या बॅनरची विटंबना; संशयित आरोपी अटकेत, शांततेचे आवाहन..

भडगाव | भडगाव तालुक्यातील बात्सर गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त लावण्यात आलेल्या बॅनरची एका समाजकंटकाकडून विटंबना करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

बात्सर गावातील जयंती उत्सव समिती व समाज बांधवांकडून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला बॅनर लावण्यात आला होता. मात्र, रात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने चावीच्या साहाय्याने हा बॅनर फाडून सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न केला. सकाळी ही घटना उघडकीस येताच स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. याची माहिती मिळताच समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे यांनी तत्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधत कारवाईची मागणी केली. सकाळी सुमारे १० वाजता त्यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांशी व पोलिसांशी चर्चा केली आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याची विनंती केली.

स्थानिक पोलीस प्रशासनाने तातडीने हालचाल करत एका संशयित आरोपीस अटक केली असून त्याने कृत्याची कबुली दिली आहे. संबंधितावर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, फाडण्यात आलेला बॅनर तात्काळ बदलण्यात आला आहे. गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी समता सैनिक दल, आर.पी.आय. आणि पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.

या प्रसंगी समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे, आर.पी.आय.चे तालुका अध्यक्ष खेडकर आण्णा, जिल्हा संघटक अभिमान बाविस्कर, जिल्हा प्रचारक अलकाताई मोरे, पाचोरा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर सावळे, भडगाव तालुका अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे