आपल खान्देशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकीय

भाजपने प्रमोद परदेशी यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली, भोसरी दिघी गवळीनगर गव्हाणेवस्ती मंडळाचे अध्यक्ष पदी निवड…

पिपंरी-चिंचवड (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेत पिंपरी-चिंचवड शहरात महत्त्वपूर्ण निवड करण्यात आले असून, भोसरी विधानसभेतील भोसरी–दिघी–गव्हाणेवस्ती मंडल (तालुका) अध्यक्षपदी प्रमोद रोहिदास परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांनी त्यांना नियुक्तीचे अधिकृत पत्र प्रदान केले.

​ही निवड राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.​

  • संघटनात्मक कार्याचा प्रदीर्घ अनुभव

परदेशी यांनी विद्यार्थी दशेपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात केली होती. आयटी (IT) क्षेत्रात उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्यांनी पूर्णवेळ समाजकारण आणि राजकारणात स्वतःला झोकून दिले. यापूर्वी त्यांनी भाजपा बूथ प्रमुख आणि शक्तीकेंद्र प्रमुख, ओबीसी मोर्चा प्रदेश चिटणीस आणि भटके विमुक्त मोर्चा प्रदेश प्रसिद्धी प्रमुख व भटके विमुक्त मोर्चा प्रदेश प्रदेश महामंत्री तसेच नमो ग्रुप फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.

  • ​सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान

​जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील ‘बदरखे’ या छोट्या गावातून आलेल्या एका सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने एवढी मोठी जबाबदारी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. “स्वतःसाठी तर सगळेच जगतात, पण समाजासाठी काहीतरी ठोस करायचे आहे, या जिद्दीने मी काम करत राहीन,” अशी भावना परदेशी यांनी यावेळी व्यक्त केली.

  • ​आमदार महेश दादा लांडगे यांचे कौतुक

​यावेळी बोलताना आमदार महेश दादा लांडगे म्हणाले की, “प्रमोद परदेशी यांची पक्षाप्रती असलेली समर्पण भावना आणि शिस्तबद्ध कार्यपद्धती इतर कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या निवडीमुळे भोसरी विधानसभा क्षेत्रातील पक्ष संघटना अधिक मजबूत होईल.”

या निवडीबद्दल शहरातील विविध स्तरांतून आणि भाजप कार्यकर्त्यांकडून प्रमोद परदेशी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे