आपल खान्देश

गिरणाई शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

पाचोरा | गिरणाई शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला अनेक विध्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांचा प्रतिसाद मिळाला.

“वाढदिवस साजरा करताना समाजाला काहीतरी परत देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे,” असे आयोजकांनी सांगितले. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जात असून, इतरांनीही यापासून प्रेरणा घेण्याची गरज आहे. गिरणाई शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर उपक्रमात  विध्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारीनी मोठ्या संख्येने सहभाग घेत रक्तदान केले. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या भावनेतून अनेकांनी स्वेच्छेने पुढाकार घेतला.

शिबिराचे आयोजन डॉ मनोज दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पाचोरा, जि. जळगांव यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांनी रक्तदात्यांचे कौतुक करत समाजासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे