कृषीवार्तादेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

अवकाळी पाऊस | वातारणात अचानक झालेल्या बदलांमुळे राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार असल्याचे शक्यता..!

राज्यासह देशभरात अवकाळी पावसाचे ढग दाटून आले आहेत. वातारणात अचानक झालेल्या बदलांमुळे राज्यातील अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. अनेक भागांमध्ये गारपीटीची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रात मराठवाड्यासह इतर भागांमध्ये 29 मार्च ते 2 एप्रिल या काळात मुसळधार पाऊस आणि वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या काळात वीज कोसळण्याचा देखील घटना घडू शकतात. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच काही ठिकाणी गारपिटीची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.

खरंतर अचानक अवकाळी पाऊस का पडण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. पण त्याला दोन गोष्टी कारणीभूत आहेत. एक म्हणजे उत्तर भारतात पश्चिमी विक्षोभ (Western disturbance) म्हणजेच पश्चिम दिशेकडून जमिनीवर वाहनारे आद्रतायुक्त वारे यांच्या संयुक्त परिणामामुळे राज्यासह देशभरात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारतीय हवामान विभागाने आगामी आठवड्यात देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. देशातील अनेक भागांमध्ये वातावरणात यायक्लोनिक सर्क्युलेशन सक्रिय झाले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. केवळ पाऊसच नाही तर वेगवान वारे, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे