पाचोरा शहरात गजबजलेल्या परिसरात भर दुपारी अचानक एका दुचाकीला आग..!
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही

- दिलीप परदेशी.
पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज परिसरात भर दुपारी अचानक एका दुचाकीला आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज परिसरात दुपारी सुमारे 3:30 वाजेच्या सुमारास एका वेल्डिंग दुकानात बाहेर उभी असलेल्या टीव्हीएस एक्सल दुचाकीतून अचानक धूर निघू लागला. काही क्षणातच दुचाकीने पेट घेतल्याने परिसरातील नागरिकांनी धावा धाव झाली. आग वाढत असल्याचे लक्षात येताच काही नागरिकांनी तत्काळ पाण्याच्या बादल्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. आणि आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र TVS एक्सल दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भर दुपारी वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
प्राथमिक अंदाजानुसार दुचाकीच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर वाहनधारकांनी आपल्या वाहनांची नियमित तपासणी करावी, असे आवाहन आमच्या कडून करण्यात येत आहे.



