वैजापूर येथे बाल मेळावा उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मनोज राजपूत |
वैजापूर गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव प्रथम एज्युकेशन फाउंडेशन (THSN),ICDS विभाग चोपडा, वैजापूर बीट आयोजित करण्यात आलेला बाल मेळावा मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. या मेळाव्यात परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजनात्मक उपक्रमांमध्ये आपली कला सादर केली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी स्पर्धांमधून आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. लहान मुलांच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसर आनंदमय वातावरणाने भारावून गेला होता.
या मेळाव्यासाठी प्रथम फाउंडेशन जिल्हा समन्वयक जळगाव च्या सुनंदा गावित मॅडम, यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. जयमाला शिरसाठ मॅडम सुपरवायझर वैजापूर बीट यांच्या सहकार्याने व वैजापूर बीट मधील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच वैजापूर ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा वैजापूर यांच्या सहकार्याने घेण्यात आला. या कार्यक्रमात मुलांच्या सर्वांगीण विकासाचे स्टॉल लावण्यात आले होते.
यावेळी वैजापूर ग्रुप ग्रामपंचायत चे सरपंच माननीय श्री दत्ता सिंग पावरा, उपसरपंच विद्या ताई, वैजापूर बीट , प्रथम जिल्हा समन्वयक सुनंदा गावित मॅडम, सुपरवायझर जयमाला शिरसाठ मॅडम, मुख्याध्यापक मा. श्री. राजेंद्र चौधरी सर, गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव फिल्ड ऑफिसर चंद्रकांत सर, गांधी रिसर्च फाउंडेशन डिप्लोमा चे विद्यार्थी, पशुवैद्यकीय अधिकारी. डॉक्टर दातीर सर, ग्रामपंचायत सदस्य. हर्षाली ताई, जिल्हा परिषद शिक्षक वैजापूर. चव्हाण सर साठे सर अभिलाषा मॅडम मनीषा मॅडम आणि सुविधा मॅडम, वैजापूर बीट मधील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा वर्कर, गावातील सर्व माता महिला भगिनी व मुले आणि किशोरवयीन मुली या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पालकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन बालकाचे विकासपत्रात जाणून घेतले आणि बाल मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फाउंडेशन डिप्लोमा चे विद्यार्थी, सुनंदा गावित मॅडम प्रथम फाउंडेशन व सुपरवायझर शिरसाठ मॅडम यांच्यासह सर्व अंगणवाडी सेविका शिक्षक व मदतनीस यांनी परिश्रम घेतले.
या बाल मेळाव्यामुळे मुलांच्या आत्मविश्वासात वाढ होऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.पालक आणि नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. आयोजकांच्या वतीने सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.



