आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रसखी

आयसीएसआय परीक्षेत गढरी धनगर समाजातुन यश प्राप्त करणारी नेहा परदेशी पहिली ठरली

वडिलांच्या शानदार कारकीर्दीला, आयसीएसआय परीक्षेत मोठे यश प्राप्त करून त्यांची कन्या नेहा हिने एक प्रकारे सॅल्युट केला

मुबंई | इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने व्यावसायिक परीक्षेसाठी आयसीएसआय सीएस निकाल २०२६ जाहीर केला आहे. त्यात धनगर समाजातुन  आयसीएसआय परीक्षेत मोठे यश प्राप्त करणारी नेहा दिलीप परदेशी ही पहिली ठरली.

नेहा दिलीप परदेशी ही गढरी धनगर समाजाची असून आयसीएसआय परीक्षा उत्तीर्ण होणारी पहिली व्यक्ती आहे. आपल्या आई वडिलांसोबत ती मुंबई येथे विले पार्ले येथे वास्तव्यास आहे,  कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ही एक प्रमुख व्यावसायिक संस्था असून यांच्या मार्फत शैक्षणिक परीक्षा ह्या दोन ते तीन वर्ष होतात. आपल्या अभ्यासाच्या जोरावर ती चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाली.

नेहा दिलीप परदेशी हिचे वडील हे मुंबई पोलीसात कार्यरत असून आई ही गृहिणी असूनही नेहाने अभ्यास करून यश मिळवत आपले कर्तुत्व सिद्ध केले. आपल्या मुबंई पोलीस वडिलांच्या शानदार कारकीर्दीला आयसीएसआय परीक्षेत मोठे यश प्राप्त करून त्यांची कन्या नेहा हिने एक प्रकारे सॅल्युट केला आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. नेहा परदेशी अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाल्याने समाजमाध्यमातून तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव सुरु आहे. लवकरच शासकीय बँक क्षेत्रात मोठे पद भूषवणार आहे.

  • भारतीय कंपनी सचिव संस्थान  काय आहे.

जागतिक प्रशासन नकाशावर एक समावेशक संस्था म्हणून, आयसीएसआय या व्यवसायाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहे. भारताच्या सामाजिक-आर्थिक विकासात उत्कृष्ट कामगिरी करण्याची क्षमता असलेल्या भारत सरकारच्या उपक्रमांमध्ये आयसीएसआय योगदान देत आहे.

कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ही एक प्रमुख व्यावसायिक संस्था आहे जी संसदेच्या कायद्यानुसार (कंपनी सेक्रेटरीज कायदा, १९८०) स्थापन करण्यात आली आहे, ज्यामुळे कंपनी सेक्रेटरीजच्या व्यवसायाचे नियमन आणि विकास होतो. ICSI भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अधिकारक्षेत्रात काम करते. ही संस्था कंपनी सेक्रेटरीज (CS) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देते आणि CS सदस्यांना सर्वोत्तम दर्जाचे मानके निश्चित करते.

नवी दिल्ली येथे मुख्यालय असलेल्या, ICSI चे देशभरात अस्तित्व आहे. नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता आणि मुंबई येथे चार प्रादेशिक कार्यालये, देशभरात ७३ अध्याय कार्यालये आणि मुंबई, हैदराबाद, कोलकाता आणि मानेसर येथे सेंटर फॉर कॉर्पोरेट गव्हर्नन्स, रिसर्च अँड ट्रेनिंग (CCGRT) आहेत. संस्थेची ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सिंगापूर, UAE, UK आणि USA येथे सहा परदेशी केंद्रे देखील आहेत. ७९,००० हून अधिक सदस्य आणि सुमारे २५०,००० विद्यार्थ्यांसह, ICSI कडे जगातील कंपनी सेक्रेटरीजचे सर्वात मोठे सदस्यत्व आणि विद्यार्थी आधार आहे.


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे