आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

अथक परिश्रमातून घवघवीत यश; आखतवाडेच्या राजेश गढरींची MPSC परीक्षेत भरारी..

आखतवाडे | पाचोरा तालुक्यातील आखतवाडे गावातील सर्वसामान्य शेतकरी तथा प्रसिद्ध दूध उत्पादक  जीवन नारायण गढरी यांचे सुपुत्र  राजेश जीवन गढरी यांनी आपल्या अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या महसूल सहाय्यक पदाच्या परीक्षेत राजेश गढरी यांनी घवघवीत यश मिळवत आपल्या कुटुंबासह आखतवाडे गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.

अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या राजेश यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीच्या बळावर हे यश मिळवले. त्यांच्या या यशातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ‘जिद्द, मेहनत आणि सातत्य असेल तर यश निश्चित’ असा प्रेरणादायी संदेश मिळाला आहे.

राजेश गढरी यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आखतवाडे तसेच परिसरातील नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून त्यांच्या कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

झूम मराठी मीडिया समूहाच्या वतीने राजेश यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे