आपल खान्देश

नगरदेवळ्याचे सुपुत्र शाहिद भैय्यासाहेब बागुल यांच्या स्मृति दिनानिमित्त अभिवादन

नगरदेवळा | सरदार एस के पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आज दिनांक 30 मार्च रोजी नगरदेवळ्याचे सुपुत्र भैय्यासाहेब रोहिदास बागुल यांच्या स्मृति दिनानिमित्त विद्यालयात प्रतिमा पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील सरदार एस के पवार विद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले भैय्यासाहेब बागुल हे भारतीय सैन्य दलात सेवेत होते. काश्मीर खोऱ्यात सेवेत असताना दिनांक 30 मार्च 2000 रोजी भैय्यासाहेब बागुल यांना वीर मरण प्राप्त झाले होते. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त दरवर्षी विद्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली जाते. 

शहीद सैनिक भैय्यासाहेब रोहीदास बागुल यांना आज शहीद होऊन 26 वर्षे पुर्ण झाली. त्यांनी सरदार एस के पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नगरदेवळा बु येथे शिक्षण घेतले आहे. आज सरदार एस के पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नगरदेवळा बु यांनी त्यांचा नावाने अभिवादन-पर फळा सजवला तसेच प्रतिमा पुजन करुन अभिवादन केले. हे आम्हा शहीद सैनिक कुटूंब म्हणून अत्यंत अभिमानास्पद आहे असे बागुल परिवारांनी बोलतांना सांगितले.

प्राचार्य श्री के एन काटकर सर, उपप्राचार्य श्री व्ही बी गहरवाल सर,पर्यवेक्षक श्री वाय डी ठाकूर सर, श्री डी पी राजपूत सर व सकाळ व दुपार सत्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे