शेतकरी बांधावरून थेट पाचोरा महावितरण कार्यालयात धडकले!
विहिरीला पाणी असतानाही पुरेशी वीज नसल्याने पाण्याचा उपसा कसा करावा, हा प्रश्न आहे.
झूम मराठी स्पेशल
पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील रबी पिके संकटात येत आहेत भारत हा शेती प्रधान देश फक्त नावालाच आहॆ का? आम्हाला आमच्या हक्काची वीज वेळेवर पूर्ण क्षमतने वीज द्या! अन्यथा आंदोलन करू, असं ठणकावून शेतकरी बांधा वरून थेट पाचोरा महावितरण कार्यालयात धडकले, भातखंडे, अंतुर्ली, परधाडे, वडगावं ओझर गावातील शेतकरी व सरपंच उपसरपंच संतप्त झाले होते.
रब्बी पिके , भाजीपाला फळभाज्या आणि विविध फळबागा सध्या पाणी देण्याच्या अवस्थेत आहेत. मात्र, पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ‘पाणी आहे; पण पुरेशी वीज नाही,’ ‘वीज आहे; पण कमी दाब आहे’, ‘दिवसा वीज असल्यास किमान चार-पाच वेळा जाते-येते,’ ‘रात्री वीज आहे; पण पाणी देता येत नाही,’ अशा विविध कारणांनी पिके संकटात आली आहेत. वीजटंचाईने त्रस्त शेतकऱ्यांनी शेत बांधा वरून थेठ महावितरण कार्यालय गाठले आपले गाऱ्हाणं वीज अधिकारी चव्हाण साहेबाना जवळ मांडलीत त्यांनी आश्वसन दिले आहॆ दोन दिवसात तुम्हाला पुरेशी वीज मिळेल.
अनेक ठिकाणी रोहित्र कमी क्षमतेचे असल्याने योग्य दाबाने वीज मिळत नाही. परिणामी ओलीत होत नाही.. विहिरीला पाणी असतानाही पुरेशी वीज नसल्याने पाण्याचा उपसा कसा करावा, हा प्रश्न आहे.



