आपल खान्देश

युवा नेतृत्वाचे आमदार किशोर आप्पा पाटिल यांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन सोहळा

पाचोरा तालुक्यातील जनतेच्या हितासाठी सातत्याने लढणारे युवा नेतृत्व तथा युवा सेना उपजिल्हाप्रमुख अनिल बारकू पाटील (टिल्लू अप्पा) यांचा वाढदिवस ५ जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.

समाजकारण आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे आणि संघटनात्मक बांधिलकी जपणारे टिल्लू अप्पा यांचा वाढदिवस मित्रपरिवार व हितचिंतकांनी राजीव गांधी कॉलनी, पुनगाव-पिरवाडी मांडकी येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

अनिल पाटील यांचा जन्म ५ जून १९९० रोजी एका सामान्य कुटुंबात झाला. पितृछत्र हरपल्यानंतरही त्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या बळावर समाजसेवा व राजकारणात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. शिवसेना शाखाप्रमुख, युवा सेना पाचोरा तालुकाप्रमुख अशा जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. तसेच पुनगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून येत उपसरपंचपदाची धुरा सांभाळली. मध्यंतरात प्रभारी सरपंच म्हणूनही त्यांनी कार्य केले.

त्यांच्या कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने व आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची युवा सेना उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली. विविध पदांवर कार्यरत असताना त्यांनी जनहित, विकासकामे आणि पारदर्शक प्रशासनाला प्राधान्य दिले.

राजकीय क्षेत्रातील त्यांच्या संयमी, अभ्यासू आणि सर्वसमावेशक कार्यपद्धतीमुळे त्यांना कार्यकर्त्यांमध्ये विशेष लोकप्रियता मिळाली आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि कार्यकर्त्यांशी जपलेला जिव्हाळा यामुळे ते शिवसेनेतील विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळखले जातात.

सामाजिक क्षेत्रातही त्यांनी शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम केले आहे. समाजातील विविध घटकांशी संपर्क ठेवून त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणे ही त्यांची कार्यशैली राहिली आहे. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेवूनही अनेक नागरिक त्यांच्याविषयी आदर आणि आपुलकीची भावना व्यक्त करतात.

विकासाभिमुख विचारसरणी, संघटन कौशल्य आणि लोकाभिमुख दृष्टिकोन यामुळे टिल्लू अप्पा यांनी पाचोरा तालुका व परिसरातील सार्वजनिक जीवनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय असलेले टिल्लू अप्पा हे आज अनेक युवकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यासाठी निरंतर यश लाभावे, अशा शुभेच्छा मान्यवरांनी व्यक्त केल्या.

यावेळी आमदार, उद्योजक, आजी-माजी उपनगराध्यक्ष, आजी-माजी नगरसेवक, पुनगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक व कर्मचारी, शिक्षक, व्यावसायिक, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वाढदिवस सोहळ्याचे सुयोग्य नियोजन पुनगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा आमदार किशोर आप्पा पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रविण आप्पा पाटील यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे