ब्रेकिंगमहाराष्ट्र

किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला, गाडीच्या काचा फुटून सोमय्या जखमी!

 

मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करण्यावरुन आक्रमक भुमिका घेतली होती. त्यानंतर राणा दाम्पत्यांच्या घराभवती मोठ्या संख्य शिवसैनिक जमा झाले होते. काल दिवसभर मुंबईत तवाणपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. राणा दाम्पत्यांने अखेर संध्याकाळी आपले आंदोलन मागे घेतले होते. त्यानंतर त्यांना खार पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेनंतर रात्री भाजप नेते किरीट सोमय्या त्यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. या हल्लात सोमय्या जखमी झाले असल्याची माहीती मिळत आहे.

या संदर्भात शिवसैनिकांचे म्हणणे असे आहे की, आम्ही सोमय्यांवर कोणत्याही प्रकारचा हल्ला केला नसून सोमय्यांच्या ड्रायव्हरने आमच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्यामुळे आम्ही आमच्या बचावाखातर त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या.हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या किरीट सोमय्या यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली असून खार पोलीस अधिकारी आणि हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली आहे. या प्रकरणावर निषेध व्यक्त करत त्यांनी ट्विटरवर पोस्ट करत आपला निषेध दर्शवला आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे