सुरत जवळील बारडोली जवळ महाराष्ट्रातील एसटी बसचा भीषण अपघात..
गुजरातमधील सूरत येथे दोन बसचा भीषण अपघात झाला असून, या अपघातात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अपघाताची भीषणता पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघातग्रस्त दोन्ही बस ह्या महाराष्ट्रातील एसटी बस असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सुरत जवळील बारडोली तालुक्यामधील मानेकपूर उवा गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला असून, अपघाताची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
अपघात झालेल्या दोन्ही बस ह्या महाराष्ट्रातील होत्या त्यापैकी एक बस ही धुळे येथून सूरतला जात होती. तर दुसरी बस ही गुजरातहून महाराष्ट्राकडे जात होती. मिळालेल्या माहितीनुसार एका बसच्या ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्याने ही बस दुभाजक ओलांडून उलटली, तर समोरून येणारी बस धडकून बाजूला गेली. उलटलेल्या बसमध्ये आग लागली. तसेच ही बस काही सेकंदांतच आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने तेवढ्यात तिथून तापी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जात होते. त्यांनी तातडीने पोलिसांना आणि संबंधित यंत्रणांना फोन करून घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू केले.



