महाराष्ट्र

पिंपरी-चिंचवड आमदार लक्ष्मण जगताप यांच्या दिर्घायुष्यासाठी व प्रकृती स्वास्थ्यासाठी गायत्री मंत्राचा जाप

झूम मराठी

पिंपरी चिंचवड :(प्रतिनिधी उमेश पाटील) चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहे की त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील बहुतांशी मंदिरांमध्ये केली प्रार्थना करण्यात आली.                     

काल सकाळी ८ ते ९ या वेळात पिंपळे गुरव येथील नवीन प्राथमिक शाळेत लोणावळा मन:शक्ति केंद्रा तर्फे ह.भ.प.मधुकर संधान सर यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या दिर्घायुष्यासाठी व प्रकृती स्वास्थ्यासाठी गायत्री मंत्राचा जप करुन प्रार्थना करण्यात आली.तसेच भगवत गीतेतील काही श्लोकांचे पठण करण्यात आले आहे.तसेच रमेश काशीद यांनी कुटुंबासमवेत शनिशिंगणापूर नगर येथे जाऊ शनि देवाची पूजा केली तर मारुती तरटे यांनी पाषाणच्या सोमेश्वर मंदिरात आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या दीर्घ आयुष्यसाठी प्रार्थना केली.

आमदार लक्ष्मणभाऊ जगताप याच्या दीर्घ आयुष्यसाठी हजारो कार्यकर्त्यांनी विविध प्रकारचे धार्मिक उपक्रम महाराष्ट्रातील बहुतांशी धार्मिक स्थळांमध्ये केले आहे. लक्ष्मणभाऊ लवकरच पूर्णपणे बरे होतील व त्यांच्या कार्यालयीन दैनंदिन कामकाजात सहभागी होतील हा सर्व मन:शक्तीच्या साधकांचा दृढ विश्वास आहे असे त्याप्रसंगी  अध्यक्ष महाराष्ट्र वारकरी महामंडळ पिंपरी चिंचवड विजू अण्णा जगताप म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे