महाराष्ट्र

पंतप्रधान मोदी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर?

झूम मराठी

मुंबई : राज्यात हनुमान चालिसेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मोदी यांना लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून माटुंगा येथील षण्मुखानंद हॉलमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे आणि राजठाकरे हे एकत्र येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सध्या राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी शिवसेनेला टार्गेट केले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून तिन्ही नेते एकाच मंचावर आल्यानंतर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सोहळ्यास महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, संपूर्ण मंगेशकर कुटुंब उपस्थित असतील.दरम्यान मास्टर दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान, मंगेशकर कुटुंबीय, हृदयेश आर्ट्सच्या वतीने मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा ८०वा स्मृती सोहळा आयोजित केला आहे. त्यात, पहिल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारासह संगीत, नाटक, कला आदी क्षेत्रातील पुरस्कारही प्रदान केले जाणार आहे. संगीत क्षेत्रासाठीतील मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार गायक राहुल देशपांडे यांना, चित्रपट सेवेसाठीचा मास्टर दीनानाथ विशेष पुरस्कार आशा पारेख आणि जॅकी श्रॉफ यांना, मास्टर दीनानाथ आनंदमयी हा समाजसेवेसाठीचा पुरस्कार मुंबईचे डबेवाले (नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट) आणि सर्वोत्कृष्ट नाटकासाठी पुरस्कार संज्या छाया नाटकास देण्यात येणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे