महाराष्ट्र

राज’ कीय माकडचाळे”…

राज’कीय माकडचाळे

असे म्हणतात की “लोकशाहीमध्ये आलेले सरकार हे लोकांच्या लायकीप्रमाणे असते”. गेली काही महिने चाललेल्या राजकारणावरून आपण आत्मपरीक्षण केले तर एक मतदार म्हणून आपण चुक तर केली नाही ना याची जाणीव व्हावी इतका वाईट काळातून आपण जात आहोत असे वाटत आहे. जगभर युद्धाचे ढग पसरलेले आहेत. गेली तीन वर्ष आपले कोरोनाने वाया गेली आहेत आणि त्यातून आता रशिया-युक्रेन मधील चालू असलेले युद्ध आणि त्यामुळे तिथल्या आयातीवर अवलंबून असलेल्या जीवनावश्यक वस्तूंचे वाढत चाललेले भाव यामुळे प्रत्येक सामान्य भारतीय अतिशय त्रस्त आहे यावर कुठलेही दुमत असू शकत नाही.

मार्च २०२० मध्ये पहिले लॉकडाऊन पडले आणि प्रथमत: आपण किती हताश आहोत हे एका क्षुद्र, न दिसणाऱ्या जीवाने आपल्याला दाखऊन दिले. या काळात आपण सर्वानीच आपले आसपासचे अनेक लोक मरताना पाहिले. या काळात आपण सगळे हतबल होतो. सर्व व्यवसाय ठप्प होते, कामगारांना काम नव्हते, हातावर पोट असलेली मानस अगदी अन्नाच्या कानासाठी हतबल होते. एका शहरातून दुसर्या शहरात जाणे तर सोडाच, अगदी स्वाताच्या गावात प्रवेश करणे देखील अवघड होऊन बसले होते. बेड, मेडिसिन, ऑक्षिजन पासून ते थेट स्मशानभूमी पर्यंतच्या सगळ्या अडचणी आपण या काळात पाहिल्या. या धकाधकीच्या जीवनात आपण काय पाहिले तर आपल्याकडे पुरेसे हॉस्पिटल्स नाहीत, आपल्याकडे अचानक येणाऱ्या संकटाचा सामना करणारी यंत्रणा नाही. आपण इतक्या वर्षात पुरेसे ऑक्षिजन प्लांट तयार करू शकलेलो नाहीत. आपण स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरापर्यंत सुखरूप पोहोच करायला कमी पडलेलो आहोत आणि सर्वात महत्वाचे आपल्याकडे स्थानिक रोजगार निर्मिती कमी असलेमुळे आपल्याकडील कित्येक लोकांना रोजगार शोधायला स्थलांतर करावे लागते. 

या काळात प्रत्येक धार्मिक स्थळ बंद होते, कारण आपल्याला माहित होते की तिथे गेल्याने कोरोन वाढण्याचीच शक्यता जास्त आहे. म्हणजे आपल्याला संकट काळात काय कामाला येते याची परिपूर्ण जाणीव कोरोन काळाने करून दिलेली आहे. या काळात काम करणारे मानवाच्या रूपातील देव आपण पाहिले. आपण कधीही पाहिले नाही की हॉस्पिटल मध्ये दाखल केलेला रुग्ण कुठल्या जाती-धर्माचा आहे. आपण हे पण पाहिले नाही की, इंजेक्शन देणारा डॉक्टर, ऑक्षिजन लावणारी नर्स, अम्बुलंस चा ड्रायव्हर आणि स्मशान भूमीत मढे जळणारा कर्मचारी कुठल्या जाती-धर्माचा आहे. कित्येक डॉक्टर्स, हेल्थ वर्कर्स, सफाई कामगार, पोलीस प्रशासन तर स्वतःचा जीव हातात घेऊन काम करत होते. त्यावेळी त्यांनी मदत करताना हा कधीच विचार केला नाही की, याचा धर्म कोणता आणि जात कोणती.

या एवढ्या हतबल काळात शास्त्रज्ञानी लस शोधली आणि हळूहळू आपण पूर्व पदावर येऊ लागलो. आजही आपण पूर्ण यातून बाहेर पडलेलो नाहीत परंतु बर्यापैकी या संकटाना आपण मागे सारले आहे. आपण जसे संकटातून बाहेर पडलो की आपण आपल्या मूळ स्वभावावर आलो. आपण आपल्या नेत्यांना याची खरेतर जाणीव करून द्यायला हवी की, तुमचे धार्मिक राजकारण बंद करा. धर्म आपल्याजागी सुरक्षित आहे. सुरक्षित नाही तो इथला सामान्य माणूस याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. पूर्ण जग बंद असताना आपल्याला आज वाचवले आहे ते विज्ञानाने हि गोष्ट आपण आपल्या मनात पक्की करून घेतली पाहिजे.

आज देशभर हिंदू-मुस्लीम हा विखारी राजकीय खेळ खेळला जात आहे. संकटाना जात धर्म नसतो हि जाणीव ठेवण्याच्या काळात आपण माणसाना माणसापासून विभक्त करण्याच्या प्रक्रियेला बळ देत आहोत हि माणूस म्हणून अभिमानाची नाही तर शरमेची गोष्ट आहे. आज मशिदीसमोर भोंगे लाऊन हनुमान चालीसा म्हणण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे काय होईल ? तुम्हाला जर मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाचा त्रास होत असेल तर त्यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबून कार्यवाही करू शकता ना. त्यामुळे समाजास वेठीस धरणे हे कुठल्याही बाबतीत योग्य नाही. यामुळे होईल काय तर रोज आपण ज्यांचेसोबत एकोप्याने राहत आलो आहोत त्यांचेसोबत विनाकारण मन कलुशित करून काय साध्य होणार आहे ? राजकीय पक्षाचे दोन घडीचे राजकारण होते पण आपली इतक्या दिवसाची नाते विनाकारण बिघडतात. बर, त्रास फक्त मशिदीतील भोंग्याचाच होतो का ? रस्त्यावर विनाकारण रोवलेले मंडप, पक्षीय मेळावे, मोठमोठाले ब्यानार्स, वाढदिवसाचे जाहीर आयोजन, रस्त्यावर मोठाले स्पीकर लाऊन नवरदेवांची काढलेली मिरवणूक हे काय आहे ? अखंड हरीनाम सप्ते, जागरण गोंधळ, भजनी मंडळ, आराधी मंडळ, जत्रा, यात्रा एक ना अनेक बाबी आहेत ज्यामुळे खूप लोकांना त्रास होतो. हे सगळे घडत असताना कुठलाही राजकीय नेता काहीच का बोलत नाही ?

आज महागाई इतकी प्रचंड वाढलेली आहे. अगदी एका लिंबाची किमत दहा रुपये झाली आहे, पेट्रोल-डीझेल, घरगुती वापराचा ग्यास या गोष्टीकडे कुणी लक्ष देणार आहे की नाही ? एखादा राजकीय नेता उठतो आणि एक धार्मिक मुद्दा काढतो आणि तो विषय बाकीचे सगळे पक्ष चघळत बसतात हे करताना यांना थोडी तरी लाज वाटत कशी नसेल ? आज कुणीतरी उठून जाहीर करतो की, असे कार्यक्रम घेण्यास आम्ही भोंगे फ्री वाटू, असंख्य उपाशी झोपणारे गरीब, पैशाअभावी शिकू न शिकलेले विद्यार्थी, बालकामगार, मजबुरीने व्यश्या व्यवसायाकडे गेलेल्या महिला, सिग्नल वर भिक मागणारे तृतीयपंथी, आर्थिक अडचणीमुळे रखडलेले दवाखाने , पडलेल्या शाळा या गोष्टी फुकट द्यायला हा माणूस का पुढे आला नसेल ? कारण याला माहित आहे की इथल्या लोकांना धर्म महत्वाचा आहे इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा .

काय पिकते त्यापेक्षा काय विकते हे द्प्ल्यासमोर ठेऊन लोक धंदा करतात आणि आपले राजकीय नेते पूर्णतः व्यावसायिक आहेत. त्यांना वैचारिक बैठक, देशाचा एकोपा, दंगलीचे दुष्परिणाम, एकसंघतेला धोका, देशाची आर्थिक परीस्तीती याचेशी काहीही देणे घेणे नाही. त्यांना फक्त मताचा व्यापर करता येतो. धर्म नावाची खेळी करून, जात नावाची चाल चालून त्यांना स्वार्थ साधायचा आहे. हे सगळे येणाऱ्या काळात आपल्या सर्वाना विनाशाकडे घेऊन जाणारे आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. कुठे बसून, कुणाच्या दारात जाऊन, कुणावर बहिष्कार टाकून किंवा कुणाला मुद्दाम विरोध करून आपल्याला तात्पुरता अघोरी आनंद मिळेल देखील पण आपण माणुसकीच्या प्रवाहातून दूर लोटले जाऊ हे देखील निश्चित आहे. त्यामुळे एक मतदार म्हणून आपण आपली लायकी वाढवली पाहिजे आणि जे लोक आपल्या मुलभूत गरजा भगवतील त्यांना आपण पाठींबा दिला पाहिजे तरच आपण येत्या काळात टिकाव धरू असे मला वाटते.

लेखन अँड महेश भोसले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे