धनगर समाजाच्या मुलीचा राज्यात डंका..
प्रतिभा सखाराम खेमनर हिची महाराष्ट्र राज्याच्या उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट व मृद व जलसंधारण विभागात क्लास वन अधिकारी म्हणून नुकतीच निवड झाली आहे.
झूम मराठी
संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथील प्रतिभा सखाराम खेमनर हिची महाराष्ट्र अभियांत्रिकी 2019 मध्ये घेण्यात आलेल्या स्थापत्य गट मृद व जलसंधारण विभागाच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवून तिची महाराष्ट्र राज्याच्या उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट व मृद व जलसंधारण विभागात क्लास वन अधिकारी म्हणून नुकतीच निवड झाली आहे.
सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेच्या भाऊसाहेब गुंजाळ पाटिल सह्याद्री विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री सखाराम मंजाबापू खेमनर यांचे कन्या असून .कुमारी प्रतिभा खेमनर हिचे प्राथमिक शिक्षण संगमनेर येथील सह्याद्री विद्यालय व ज्युनियर मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. अमृतवाहिनी अभियांत्रिकी कॉलेज अमृतनगर येथे अभियांत्रिकी पदवी विशेष. अमृतवाहिनी अभियांत्रिकी कॉलेज अमृतनगर येथे अभियांत्रिकी पदवी विशेष प्रावीण्य संपादित केल्याबद्दल अमृतवाहिनी कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकावला .तर पुणे विद्यापीठात तृतीय रँक मिळवला. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये कठोर मेहनत चिकाटी जिद्द अभ्यास करून तिने हे यश प्राप्त केले आहे.

महाराष्ट्र राज्य महावितरण विभागाचे अभियांत्रिकी इंजीनियरिंग पदावर आदर्श प्रमाणे काम केले आहे .नुकतीच तिची उपविभागीय मृद व जलसंधारण अधिकारी या पदावर क्लास वन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. तिच्या या यशाबद्दल राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉक्टर सुधीर जी तांबे. नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित भाऊ थोरात. महानंदा चे अध्यक्ष रणजित देशमुख सह्याद्री शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी लक्ष्मण कुठे .सह सेक्रेटरी दत्तात्रेय चासकर, रजिस्टर बाबुराव गवांदे. प्राचार्य मच्छिंद्र दिघे सर शिक्षक वृंद कर्मचारी वर्ग तसेच धनगर समाजातून व सोशल मिडियातून संबंध महाराष्ट्रातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




