महाराष्ट्र
खान्देशनी कहानी। साहित्यिकना जुबानी, फिफ्टी फिफ्टी अहिराणी!
खान्देशनी कहानी। साहित्यिकना जुबानी, फिफ्टी फिफ्टी अहिराणी!
दोन साहित्यिक मोहनदादा पाटील आणि देवदत्त बोरसे यांनी उत्तरमहाराष्ट्र खान्देश विकास मंडळाच्या हाकेला प्रतिसाद देऊन खान्देशच दुःख जगा समोर मांडायला सुरवात केली आहे.
आपल्या राज्यात खान्देशवर 70 वर्ष सतत अन्याय होत आहे. ते आपण निमूट पणे सहन करीत आहोत. खान्देशाला मुख्यमंत्री पद मिळाले नाही. खान्देशाच्या वाट्याच पाणी अडविणारी काम झाली नाहीत. उद्योग व्यवसाय नाही. त्यामुळे रोजगार नाही. रोजगार नसल्यामुळे लोक कामाच्या शोधात दाही दिशाना स्थलांतर करीत आहेत. त्यामुळे खान्देशातील लोकसंख्या घटून तीन विधानसभा मतदार संघ घटले आहेत. शहादा-दोंडाईचा, यावल आणि पारोळा मतदार संघ नाहीसे झाले आहेत. दळण वळणाची साधन नाहीत. ब्रिटिशानी तयार केलेल्या रेल्वे मार्गा व्यतिरिक एक फूट नवा रेल्वेमार्ग तयार नाही. खान्देशसाठी स्वतंत्र रेल्वे नाहीत. त्यामुळे लोक मिळेल त्या रेल्वेत चढून प्रवास करतात आणि आतील प्रवासी आमच्या या रेल्वे प्रवाशांना गाडीतून बाहेर फेकून देतात. पवन एक्सप्रेस मधून 6 लोक फेकले. ताप्ती एक्सप्रेस मधून 6 खान्देशी लोक फेकले. अजून एका गाडीतून एका पत्रकारांला फेकले. हे सर्व लोक मेले त्यांची चौकशी झाली नाही. कोणाला साधी अटक झाली नाही. रेल्वेने मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई दिली नाही. यासाठी लोकसभेत विधान सभेचे कोणी आवाज उठवला नाही. खान्देशात काही उत्पादन होत नाही. त्यामुळे पैशाची आवक नाही. खान्देशातील लोक जे काही तुटपुंज उत्पादन काढतात, त्यातील कर-महसूल पैशाच्या रूपाने त्यांचा पैसा खान्देश बाहेर करतो. पण बाहेरून खान्देशात कोणताही पैसा येत नाही. त्यामुळे खान्देशी माणसाचं दरडोई उत्पन्न राज्यातील ईतर भागापेक्षा खूप अल्प आहे. या विरुद्ध, लोकप्रतिनीधी, जनता आणि वृत्तपत्र यांनी आवाज उठविला पाहिजे. त्यांना अहिराणी साहीत्यिकांनी दिशा दिली पाहिजे.
अहिराणी साहित्यिकांनी त्यांच्या लिखाणातून हा अन्याय मांडला पाहिजे. खान्देश महाराष्ट्रात आहे पण महाराष्ट्र खान्देशात कुठेच दिसत नाही. महाराष्ट्राची विकास काम खान्देशात कुठे दिसत नाहीत. यावर कविता, कथा, निबंध लिहिले पाहिजेत. अन्यायाला वाचा फोडणारे लेखक मला हवेत. कोणत्याही भाषेत लिहा. प्राधान्य क्रमाने अहिराणीत लिहा. मराठी हिंदीत लिहल तरी चालेल.
मोहन पाटील आणि देवदत्त बोरसे यांच्या दोन कविता सोबत पाठवितो त्या वाचा. इतरांनीही अस लिहा. सर्वानी लिहावं अशी अपेक्षा आहे. हट्ट नाही. फक्त 50% लेखकांनी त्यांच्या लिखाणातील 50% साहित्य जरी खान्देश वरील अन्यायावर लिहिलं तरी क्रांती होईल.
लेखन- देविदास बापूसाहेब हटकर




