महाराष्ट्रराजकीय
मुंबईच्या काँग्रेस मोर्चात नेते, कार्यकर्ते बैलगाडीवरुन खाली पडले!
एस. म्हात्रे- मुंबई प्रतिनिधी
मुंबई : इंधन दरवाढीवरून काँग्रेस पक्ष सध्या राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन करत आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वात आज मुंबईत हे आंदोलन पार पडले. यावेळी पेट्रोल, डिझेलच्या निषेधार्थ बैलगाडीवरून मोर्चा काढण्यात आला होता. मात्र आंदोलनादरम्यान बैलगाडी तुटली व काँग्रेस कार्यकर्त्यांसह भाई जगताप खाली पडले. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार प्रसाद लाड यांनी ट्वीट करत जगताप यांना खोचक टोला लगावला आहे
'गाढवांचा' भार उचलायला, 'बैलांचा' नकार!
मा. @BhaiJagtap1 तुम्हाला सांगू इच्छितो की, "माणसाने झेपेल तेवढंचं करावं!"
असे पब्लिसिटी स्टंट करताना, त्या मुक्या जीवांचा विचार करावा! pic.twitter.com/dbceBpX6J5— Prasad Lad (@PrasadLadInd) July 10, 2021



