राज्यासह तुमच्या शहरात चोरांचा धुमाकूळ चालू असतांना बुद्धीवंतांनो, तुम्ही आहात कुठे?
आठ वर्षांपूर्वी एक चायवाला प्रधानमंत्री झालेत जळगांला दारूवाला आमदार झाला .एक टपरीवाला पालकमंत्री झाला.रेतीवाला महापौर झाला.आता एक रीक्षावाला मुख्यमंत्री झाला.एक वकील येऊन बोलला ,हे देशाचे भविष्य!एक प्राचार्य बोलला,खेडखंडोबा केला लोकशाहीचा! डॉक्टर म्हणाला,या विषयावर न बोललेले बरे!का बोलू नये?हार मानली काय?भीती वाटली काय?अशीच भीती टिळक,गांधी,नेहरू, सुभाष, सावरकर यांनी बाळगली असती तर?आपण तर बैरिष्टर आहोत.इंग्रज आपल्याला काय नडतात?आपले कुठे अडून जाते?उलट ते तर लॉर्ड,रावसाहेब, रावबहादूर,रेव्हरंड,फादर पदवी देऊन सन्मान देतात.मग कशाला विरोधात जाऊन लढायचे?सुखाचे दिवस दुखात घालवायचे?उगाच मंडाले आणि एरवडा वगैरे!आपण काय चोर आहोत?आपण काय गुन्हेगार आहोत?आपलेच कपडे पैरीस ला नेऊन इस्तरी करून आणतात.तर मग, कशाला घरच्या भाकरी उकिरड्यावर खायच्या?फुकट लष्कराच्या भाकरी का भाजायच्या?कोर्ट,पॅंट,टॉय सोडून धोती कुडता किंवा पंचा का नेसायचा?असा विचार केला असता तर, इंग्रजांनी पंचांग पाहून,हस्तरेषा पाहून भारत सोडून दिला असता का?हा घ्या भारत.नको आम्हाला.कुणावर जुलूम करणे चांगले वाटत नाही, आम्हाला पण आजच्या डॉक्टर, वकील, इंजिनिअर, प्रोफेसर लोकांना वाटते कि,चायवाले,रीक्षावाले,दारुवाले,रेतीवाले आमची सभ्यता पाहून सत्ता सोडून देतील.म्हणतील, या, डॉक्टर साहेब,या वकील साहेब,या प्रोफेसर,ही सत्तेची खुर्ची तुमच्या साठी आहे.आम्ही चुकून बसलो.माफ करा आम्हाला.आमच्यामुळे लोकशाही चा नाश होत आहे.एकतर अधिकारी काय हिशोब करतात, आम्हाला कळत नाही.तुम्हाला कळते तर बसा या खुर्चीवर.तुम्ही प्रधानमंत्री व्हा.तुम्ही मुख्यमंत्री व्हा.तुम्ही आमदार व्हा.तुम्हीच पालकमंत्री व्हा.तुम्हीच महापौर व्हा.आणि करा सुखनैव कारभार.चालवा हा देश करा विकास शेतात चोर आणि ढोर शिरले तर अभंग म्हणून, सुभाषित म्हणून,शुभम करोती कल्याणम म्हणून बाहेर पडत नाही.
त्याची व्हिडिओ, ऑडिओ काढून व्हायरल करून प्रसारीत केल्याने ते बाहेर पडणार नाही.त्याला हाकलावे लागते.त्याला पिटाळून द्यावे लागते.आणि तेथे बांधावर दक्ष राहावे लागते.तसेच लोकशाही चे आहे.नेत्यांच्या ट्वीट ची ,भाषणाची क्लीप पाहून त्यावर टिका टिप्पणी करून लोकशाही चालत नाही. पवार काय म्हणाले? ठाकरे काय म्हणाले? शिंदेंनी काय केले? फडणवीस यांनी काय करवून घेतले? राऊतने आगीत कसे तेल ओतले? असे म्हणून लोकशाही चे रक्षण होणार नाही. शिंदेच्या मंत्रीमंडळात चोर, भ्रष्ट,गुंड, गुन्हेगार लोक मंत्री बनू नये.यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
यश,अपयश नंतरचा परिणाम.पण ध्येय धोरण तरी तसे अवलंबले पाहिजे.कि , आम्हाला असा माणूस मंत्री बनलेला चालणार नाही.आमची जिल्हाची डीपीडीसी याच्या हाती सोपवली तर हा लूट करील.आमचा कराचा पैसा,कोणी ऐरागैरा माणूस परस्पर धुळधाण करील तर आम्ही का सहन करायचे?ही ठाम भूमिका घेतली पाहिजे.जेणेकरून नको असलेला माणूस आमचा पालकमंत्री, आमच्या डीपीडीसीचा अध्यक्ष होऊ नये.आणि जर याकडे दुर्लक्ष केले आणि नको तो माणूस पालकमंत्री बनला तर त्याने केलेल्या अपहाराचा पाठलाग पोलिस आणि कोर्ट सुद्धा करू शकणार नाही.तुम्ही तर मुळीच नाही. म्हणून लोकशाहीच्या शेताच्या बांधावर दंड व दंडक घेऊन दक्ष असणे आवश्यक आहे.चोर आणि ढोर लोकशाहीच्या शेतात शिरू नये, यासाठी प्रत्येक मतदाराने जागृत असले पाहिजे डॉक्टर, वकील, इंजिनिअर, प्रोफेसर यांनी यात पुढाकार घेतला पाहिजे.
राज्यात, जिल्ह्यांत ,शहरात असा चोरांचा धुमाकूळ चालू असतांना बुद्धीवंतांनो, तुम्ही आहात कुठे?तुमचा आणि लोकशाहीचा संबंध नाही काय?चोर आणि ढोर आज शेतात शिरले. उद्या घरात शिरून किचनमध्ये शिरले तर ?बुद्धीवंतांनो, तुम्ही आहात कुठे? मी शोधतो. या सोबतीला!
शिवराम पाटील मो ९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव
Disclaimer : वरील लेख एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. झूम मराठीच्या टीम अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व #झूम मराठी स्वीकारत नाही.



