भीम आर्मीने रावेर वाघोदे खु| येथील अतिक्रमण ग्रस्त पीडित कुटुंबाला न्याय मिळवून दिला..
झूम मराठी वृत्त
रावेर (प्रतिनिधी) रावेर येथील अतिक्रमण ग्रस्त पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी भीम आर्मीने व्हिडीओ शेअर करत समाज माध्यमातून राज्यभर तेथील ग्रामपंचायत प्रशासनावर टिका झाली. त्या ठिकाणी भीम आर्मी पदाधिकारी यांनी भेट दिली.
भिम आर्मी भारत एकता मिशन, जळगांव जिल्हा युनिट च्या क्रांतीलढ्याला यश, महामानव,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शपथ सार्थ ठरविली.
काय होता सदर व्हिडीओ येथे पहा
सदर भेटीवेळी “भिम आर्मी” भारत एकता मिशन जळगांव जिल्हा प्रमुख यांनी पीडितांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असे भिम वचन दिले. भिम आर्मी भारत एकता मिशन, जळगांव जिल्हा प्रमुख गणेश सपकाळे यांचे नेतृत्वात दि.१७ जुलै २०२२ रोजी,वाघोदे खुर्द ता.रावेर येथे अतिक्रमण ग्रस्त पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शेकडो पदाधिकारी यांनी भेट घेतली.
“न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही” असे सदर वचनाला सार्थकी ठरवण्यासाठी काल भिम आर्मी जळगांव जिल्हा प्रमुख गणेश भाऊ सपकाळे हे आपल्या स्वतःच्या वाहनात पीडित कुटुंबाला घेऊन रावेर तहसील कार्यालय येथे धडकले असता, पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करून त्यांना शासन स्तरावरून आर्थिक मदत द्यावी अश्या स्वरूपाचे निवेदन दिले असता तहसीलदार मॅडम यांनी घटनेचे गंभीर्य बघून तेथे उपस्थित वाघोदे खु. गावचे ग्रामसेवक यांना नोटिस स्थगित करून पीडितांना न्याय देण्याचे दृष्टीने ग्रामपंचायत हद्दीतील जागा देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचे आदेश दिले व सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले, भिम आर्मी भारत एकता मिशन,जळगांव जिल्हा युनिटने तेथील हुकूमशाही ग्रामपंचायत प्रशासनाचा कुटील डाव हाणून पाडला व सदर प्रसंगी शेकडो पदाधिकारी हजर होते अशी माहिती “भिम आर्मी” भारत एकता मिशन जळगांव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रबुद्ध खरे यांनी आमच्या झूम मराठी न्यूजला दिली.
जाहिरात





