ब्रेकिंग

बाजारात जायचंय? पाच रुपयांची पावती फाडा! गर्दी नियंत्रणासाठी नाशिक महापालिकेचा अनोखा पॅटर्न!!

पाच रुपये प्रतिव्यक्तीप्रमाणे प्रवेश शुल्कासह केवळ एकच तास उपलब्ध करून देण्याचा अफलातून प्रयोग शहरातील मुख्य बाजारपेठांसह विविध उपनगरांमधील बाजारांमध्ये सोमवारी (दि.२९) पोलीस व मनपा प्रशासनाकडून राबविण्यास सुरुवात करण्यात आली

झूम मराठी न्यूज मीडिया 

नाशिक : बाजारपेठांमध्ये नागरिकांना खरेदीसाठी पाच रुपये प्रतिव्यक्तीप्रमाणे प्रवेश शुल्कासह केवळ एकच तास उपलब्ध करून देण्याचा अफलातून प्रयोग शहरातील मुख्य बाजारपेठांसह विविध उपनगरांमधील बाजारांमध्ये सोमवारी (दि.२९) पोलीस व मनपा प्रशासनाकडून राबविण्यास सुरुवात करण्यात आली. दुपारनंतर मेनरोड, शिवाजीरोड येथील मुख्य बाजारपेठेकडे जाणारे महत्त्वाचे रस्ते पोलिसांनी बॅरिकेडिंग करत बंद केले. या भागात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला पाच रुपयांची पावती मनपा कर्मचाऱ्यांकडून दिली जात होती.शहर व परिसरात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. जिल्हा प्रशासनाने विविध प्रकारचे निर्बंध जारी केले आहे; मात्र नागरिकांकडून बाजारपेठांमध्ये नियमांचे उल्लंघन होतच असल्याने पोलीस व मनपा प्रशासनाने या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी खरेदीसाठी वेळमर्यादा अन‌् प्रवेश शुल्क वसुलीची मात्रा शोधून काढली आहे. या प्रत्येक पॉइंटवर मनपा कर्मचाऱ्यांसोबत पोलीस कर्मचारीही दोन सत्रांत बंदोबस्तासाठी तैनात राहणार असल्याचे उपायुक्त अमोल तांबे यांनी सांगितले.  

कोरोनाची दुसरी लाट येताच नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक बघायला मिळत असून सध्या एकूण कोरोना रुग्णसंख्या 1 लाख 71 हजार 735 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 1 लाख 44 हजार 531 रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचं प्रमाण 84.11 टक्के आहे. आतापर्यंत 2 हजार 326 बाधितांचा मृत्यू झालाय तर 24 हजार 979 कोरोनाग्रस्तावर आता उपचार सुरु असून अचानक झालेल्या या रुग्णवाढीमुळे आरोग्य यंत्रणाही पूर्णतः कोलमडलीय. विशेष म्हणजे पुन्हा एकदा नाशिक लॉकडाऊन होण्याची दाट शक्यता आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे