महाराष्ट्रविदर्भ

चिमुकलीची २१ दिवसांपासुन जगण्यासाठी धडपड अखेर संपली; बुलढाण्यात सगळ्यांना कोसळलं रडु..

बुलढाणा (झूम मराठी) उकळत्या दुधाच्या कढईत चिमुकली पडली. अंगाची प्रचंड लाहीलाही झाली असेल तिच्या. कुटुंबीयांनी उपचारही केले, मात्र तिने उपचारांना प्रतिसाद दिला नाही, अखेर तिचा मृत्यू झाला. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्याच्या मलकापुरातील (Malkapur) जाधववाडी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. ओमश्री युवराज जाधव (वय 6 वर्षे) असे त्या दुर्दैवी चिमुकलीचे नाव आहे.

ही घटना 21 दिवसांपूर्वी घडली होती. मात्र काल (18 मे) उपचारादरम्यान ओमश्री जाधव या चिमुकलीचा मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयश ठरली आणि तिने अखेरचा श्वास घेतला.

  • घरासमोरील उकळत्या दुधाच्या मोठ्या कढईत पडली,

मलकापूर शहरातील हनुमान चौकात ओमश्रीचे वडील युवराज जाधव यांची डेअरी आहे. ते कुटुंबासह नांदुरा रोडवरील जाधववाडी परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरासमोरील आवारात नेहमीप्रमाणे मोठ्या कढईत दूध उकळण्यासाठी ठेवले होते. घटनेच्या दिवशी ओमश्री भावंडासोबत खेळता खेळता अनावधानाने दुधाच्या कढईत पडली.

  • 21 दिवस मृत्यूशी झुंज, अखेर काल प्राण सोडले…

ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच तिला तात्काळ बाहेर काढून उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवले. तिथे प्राथमिक उपचार झाल्यानंतर पुढील उपचारासाठी तिला जळगाव (खान्देश) येथे नेण्यात आले. मात्र ओमश्रीची प्रकृती गंभीर असल्याने तिला तातडीने मुंबईत नेण्यात आले. तिथे तिच्यावर एकापाठोपाठ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शेवटपर्यंत तिची मृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर तीन आठवडे उपचार करुनही तिच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही. अखेर 21 दिवसांनी तिचा मृत्यूशी सुरु असलेला संघर्ष संपला आणि काल सकाळी तिचं निधन झालं. या घटनेमुळे मलकापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे