Kusumba | कुसुंब्यात अहिल्यादेवी सभागृहाच्या पहिल्या वर्धापना निमित्त आरोग्य शिबिर संपन्न
कुसुंबा (झूम मराठी) धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंती व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृहाचे प्रथम वर्धापन दिना निमित्त मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले, या शिबीराला नागरिकांचा उस्फुर्त सहभाग लाभला.
राज्यसभेचे माजी खासदार डॉ विकास महात्मे यांच्या धनगर समाजाचा विकासाच्या २२ योजने सह संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृहाची योजना आखून प्रत्यक्षात अंमलबजावणी केली, त्या पैकी एक कुसुंबा गावात भव्य सभागृह बांधण्यात आले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंती व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृहाचे प्रथम वर्धापन दिना निमित्त मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले, या शिबीराला नागरिकांचा उस्फुर्त सहभाग लाभला.
येथे पहा व्हिडीओ
————————————————–
या कार्यक्रमा प्रसंगी गावातील अनेक मान्यवरासह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला, यात किरण शिंदे, माजी सरपंच गेंदा नागो परदेशी , माजी महिला सरपंच गंगाबाई गेंदा परदेशी , महादु आबा, जिजाताई परदेशी, छबीलाल परदेशी, धनराज शिंदे (RTO), उपसरपंच जाधव, पंचायत समिती सदस्य रितेश परदेशी , ग्रा.प,सदस्य राजेंद्र परदेशी , रोहित परदेशी, डॉ लेखराज शिंदे, प्रा.डॉ. दत्ता परदेशी, डॉ शरद जोशी, जेष्ठ कवी निंबा धनगर, समाजसेवक पंडित परदेशी, मा.उपसरपंच अरुण ठमलाल परादेशी, राजेंन्द्र सुर्यवंशी, नारायण परदेशी, दिपक परदेशी, मुकेश धनगर, उत्तम महादु परदेशी, दत्तात्रय नथ्थु परदेशी, बाबुलाल परदेशी, दिलीप गरबड यांच्या सह सर्व समाजाचे पंच प्रमुख अध्यक्ष , सर्व ग्रामपंचायत सदस्य ,उषाताई परदेशी, कल्पना परदेशी , ज्योती परदेशी , विदया परदेशी यांच्या सह शिक्षक वर्ग, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते, सदर कार्यक्रम आरोग्य दुत अभिलाल दादा देवरे यांच्या सहकार्याने व कुसुंबा धनगर समाज यांच्या सह धनगर समाज संघर्ष समितीचे प्रदेश सचिव ज्ञानेश्वर परदेशी, उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाचे उपाध्यक्ष संदिप पांढरे, धुळे जिल्हा युवा अध्यक्ष चेतन पाटील, ज्ञानेश्वर मासुळे, राकेश परदेशी, राजु पहेलवान, समाधान परदेशी, यांनी आयोजनात सहभाग घेतला, सेवा हाऊस्पिटलचा स्टाफ यांनी शासकीय योजेनेतुन मोफत उपचाराची माहीती दिली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश परदेशी यांनी केले.



