महाराष्ट्र

संविधानाची शपथ घेऊन संपन्न झाला येथे अनोखा विवाह..

ना फेरे, ना मंत्रजप, थेट संविधानाची शपथ घेऊन संपन्न झाला येथे अनोखा विवाह….जाणुन घ्या कारण

सध्या देशात लग्नाचा धडाका सुरू आहे. आतापर्यंत लाखो लोकांची लग्ने झाली आहेत. बहुतेक जोडपी पारंपरिक पद्धतीने लग्न करतात. पण, अशी काही जोडपी आहेत ज्यांनी वेगळ्या पद्धतीने देखील लग्न केले आहे. यातील काही प्रकरणे अशी आहेत की ती लोकांची मने जिंकतात, तर काहीबद्दल ऐकून थक्कही व्हाव लागतं. नुकतेच बिहारमधून असेच एक प्रकरण समोर आले होते, ज्यात एक एअर होस्टेस वधू थेट घोड्यावर बसून वराच्या घरी पोहोचली.

तर अन्य एका आयएएस वधूने कन्यादान करण्यास नकार दिला. पण, आता समोर आलेले प्रकरण अगदी वेगळे आहे. कारण, या लग्नात ना मंत्रोच्चार घेतला गेला ना मंत्र उच्चारला गेला, थेट संविधानाची शपथ घेऊन हा विवाह संपन्न झाला.

हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. ओडिशातील गंजाम जिल्ह्यात असा विवाह झाला आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. या लग्नात पारंपारिक प्रथा पाळल्या गेल्या नाहीत. तर वधू-वरांनी संविधानाची शपथ घेऊन लग्नाची गाठ बांधली. मिळालेल्या माहितीनुसार, 29 वर्षीय बिज्या कुमार आणि 27 वर्षीय श्रुतीने मोठे पाऊल उचलले आणि रविवारी लग्न केले

एवढेच नाही तर या दोघांनीही यावेळी रक्तदान केले आणि शरीराचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. लग्नाला आलेल्या अनेक पाहुण्यांनीही रक्तदान केले. या लग्नाबाबत वराचे वडील डी मोहन राव सांगतात की, 2019 मध्ये वधूच्या आई-वडिलांची समजूत घातल्यानंतर माझ्या मोठ्या मुलासाठी अशा प्रकारचे लग्न लावण्यात आले होते.

लोकांना जागरूक करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. निवृत्त सरकारी कर्मचारी डी मोहन राव म्हणतात की राज्यघटना हा प्रत्येक भारतीयासाठी पवित्र ग्रंथ आहे आणि त्यात अंतर्भूत असलेल्या आदर्शांची लोकांना जाणीव असणे आवश्यक आहे.

शपथ घेतल्यानंतर आणि पुष्पहार घालून श्रुती म्हणाली की, आम्हाला आशा आहे की आमचे लग्न एक आदर्श ठेवेल आणि भविष्यात आम्हाला त्याचे पालन करण्याची प्रेरणा देईल. या भागात आतापर्यंत किमान चार विवाह झाल्याचे सांगण्यात येत आहे. भविष्यात आणखी अनेक तरुण अशा विवाहांसाठी पुढे येतील, असा अंदाजही वर्तवला जात आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे