महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ; निलंबनही तातडीने रद्द होणार : अनिल परबांची घोषणा

ऐन दिवाळीमध्‍ये सुरु झालेला एसटी कर्मचार्‍यांचा संप सुटेल अशी आशा निर्माण झाली आहे. राज्य सरकारकडून सटी कर्मचार्‍यांना पगारवाढ या महिन्यापासून जाहीर केली आहे. राज्‍य सरकारने अंतरिम वेतनवाढीच्या प्रस्‍तावाला एस. टी. कर्मचारी शिष्‍टमंडळाने मंजुरी दिली आहे. यामुळे मागील तीन आठवड्यांहून अधिक काळ एसटी बंद आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत झालेल्या निर्णयाची माहिती दिली. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत यांच्‍यासह मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती होती.

सरकारकडून वेतनवाढीचा प्रस्वाव दिल्यानंतर अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेऊन उद्यापासून कामावर हजर होण्याचे आवाहन केले आहे.

कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय

  • १ ते १० वर्षाच्या कामगारांच्या पगारात ५ हजार वाढ
  • १ ते २० वर्ष नोकरी झालेल्यांसाठी ४ हजार रुपयांची वाढ
  • दरवाढ आणि भत्ता राज्य सरकार कर्मचाऱ्यांप्रमाणेच देणार
  • अहवालानंतर विलीनीकरणावर निर्णय होणार
  • पगारवाढ नोव्हेंबर महिन्यांपासूनच होणार
  • पगार वेळेत राज्य सरकारची हमी
  • सदाभाऊ खोत आणि पडळकरांनी मान्यता दिली आहे
  • कामगारांनी उद्यापासून कामावर हजर व्हावे
  • निलंबन तातडीने रद्द करणार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अर्थमंत्री अजित पवार आणि अनिल परब यांच्यासोबत सोमवारी (दि. 22) बैठक घेतली होती. या बैठकीत पवार यांनी तातडीने विलीनीकरण करणे शक्य नसेल, तर कर्मचार्‍यांना 2020-24 या कालावधीसाठी भरघोस पगारवाढ देऊन तोडगा काढावा. तसेच समितीचा अहवाल आल्यानंतर विलीनीकरणाबाबत निर्णय घ्यावा, असा एक पर्याय सुचवला होता. हा पर्याय समोर ठेवूनच बैठकीत चर्चा झाली होती. मंगळवारी सायंकाळी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीतील चर्चेचा तपशीलीबाबत माहिती देताना परिवहन मंत्री परब म्‍हणाले होते की, संपावरील कामगार जरी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असले, तरी त्याबाबत हायकोर्टाने एक समिती नेमली आहे. ही वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडली. या समितीचे काम सुरू आहे. ही समिती आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करील आणि मुख्यमंत्र्यांकडून तो हायकोर्टाला सादर होणार असल्‍याचेही परब यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे