ब्रेकिंग

शिक्षक पतसंस्थेची निवडणूक

 

कोणाची पत किती?

 

समता विरूद्ध X  सर्व समावेशक.

 

मुंबई(( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) शिक्षक पतसंस्था निवडणूक जाहीर झाली. राज्यातील शिक्षक निवडणुकीत व्यस्त. शिक्षक म्हंटला की तो सर्व क्षेत्रात आघाडीवर असतो. राज्यातील लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेतील निवडणुकीसाठी नेहमीच कर्तव्यावर असलेल्या शिक्षकांना आता स्वतःच्याच निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर जावे लागणार आहे. शिक्षक पतसंस्था साठी  राज्यभरातून 119 शिक्षकांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. संचालक पदावर डोळे ठेवून राजकारणात उडी घेतली आहे. मुळात पतसंस्थेची निवडणूक असली तरी या निवडणुकी सर्वच  राजकीय पक्ष आपली ताकद लावून आपली क्षमता बघण्यात व्यस्त झाले आहेत, आणि सोशल मीडियावर उमेदवारी अर्ज भरल्याचे आणि एकमेकांशी युती केल्याचे फोटो फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम जाहीर केले आणि  काही शिक्षकांनी ते फोटो पाहून कपाळावर हात मारून घेतला. सर्वसामान्यपणे पतसंस्थेचे मुख्य कार्य म्हणजे शिक्षकांना आर्थिक मदत करणे. राज्यातील कायमस्वरूपी असलेले शिक्षक या पतसंस्थेचे सदस्य आहेत. शिक्षकांबरोबरच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संस्थेचे सभासद असतात. अंदाजे 35000 सदस्य असलेल्या या सदस्यांना या निवडणुकीत भाग घेता येणार आहे. उपलब्ध माहितीनुसार 29 हजारच्या आसपास या निवडणुकीत मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत मुंबई व ठाणे या विभागातून सर्वाधिक म्हणजे अंदाजे 50 टक्क्याहून अधिक 16000 सदस्य निवडणुकीत मतदान करणार आहेत. यामुळे निवडणूक प्रक्रियेची विजय प्रक्रिया बहुतांश पणे मुंबई ठाणे विभागावर अवलंबून आहे. आपले भवितव्य टिकवण्यासाठी राजकीय चुरस वाढली आहे. शिवसेना, भारतीय जनता पार्टी, कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या नेत्यांनी आपले स्वतःचे भविष्य डोळ्यासमोर ठेवून पतसंस्थेच्या निवडणुकीत आपले उमेदवार निवडून येण्यासाठी आपले बळ पणाला लावले आणि असे करत असताना ज्यांना आपले राजकीय शत्रू मानले होते गेली पाच वर्ष एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप करत होते तेच कोकण भवनाच्या हिरवळीवर एकमेकांना फुलाचे गुच्छ देऊन स्वागत करत होते. गळ्यात गळा घालून एकीचे गाणे गात होते. युती, आघाडीचे बंधन तयार करत होते., हे राजकीय चित्र पाहिल्यावर महाराष्ट्रातील तीन पक्षांच्या  सरकारची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

 

18 डिसेंबरला या निवडणूका घोषित झाल्या आहेत आणि 19 संचालक पदाच्या निवडीसाठी 19 डिसेंबर हीच तारीख मतमोजणी साठी घोषित करण्यात आली आहे. शिक्षक पतसंस्थेच्या राज्यभरात 23 शाखा असून एकूण 19 संचालकाचे भवितव्य 18 डिसेंबरला मतपेटीत बंद होणार आहे. आठ डिसेंबरला अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. उमेदवाराला दोन हजार रुपये अनामत रक्कम म्हणून निवडणूक आयोगाकडे जमा करायचे आहे. परंतु उपलब्ध माहितीनुसार आणि काही सूत्रांकडून या निवडणुकीत उमेदवारासाठी म्हणून काही उमेदवारांनी अंदाजे साडेतीन ते चार लाख रुपये अर्ज भरताना संबंधित व्यक्तीकडे जमा करण्याचे सांगितले आहे आमच्या प्रतिनिधीने काही नेत्यांशी संपर्क साधला असताना खासगीत सांगितले की ही निवडणूक इतर निवडणुकीप्रमाणेच आहे. मतदारांना बाहेर काढण्यासाठी, निवडणूक स्थळापर्यंत घेऊन जाण्यासाठी गाडीचा वापर करावा लागतो, मतदारांना मेळावा घेण्यासाठी हॉल आणि तो सुद्धा एसी पाहिजे. भोजन व्यवस्था, चहापान, जाहिरात, छपाई खर्च, कार्यकर्ते त्यांचे ” मान” धन” या महागाईच्या काळात एवढा खर्च येतो आणि तो खर्च उमेदवाराला करणे अपेक्षित आहे म्हणून उमेदवाराची आर्थिक क्षमता पाहून तिकीट वाटप केले जाते. निवडणुकीचे महत्त्व लक्षात घेता भारतीय जनता पक्षाचे माझी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी दादर येथील सभागृहात आपल्या कार्यकर्त्यांची सभा घेतली आणि निवडणुकीचे महत्त्व समजावून सांगितले. मुंबई शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या कार्यकर्त्यांची सभा सुभाष मोरे जालिंदर सरोदे यांनी शिक्षक भारतीच्या कार्यालयात बोलावली आणि आपण कशाप्रकारे मुंबईच्या आमदाराच्या प्रभावाखाली ही निवडणूक जिंकू शकतो याचे गणित समजावून सांगितले तर मंत्रालयातून  एका महिला उमेदवारासाठी फोन करून त्यांना तिकीट देण्याची संबंधित कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आली व ती मान्यही करण्यात आली. विद्यमान पँनल आज तरी सक्षम दिसत असेल तरी समविचारी पॅनल त्यांना आव्हान देण्याच्या तयारीत आहे. आता समविचारी पालन म्हणजे काय? काय गौडबंगाल आहे? समविचारी म्हणजे काही समान तत्ववांवर आणि विचारांवर राजकीय हेतूने प्रेरित झालेले व हंगामी नवविचाराणे निर्माण झालेला ग्रुप. शिवनाथ दराडे या नेत्याशी अनौपचारिक गप्पा मारताना  आपले संपूर्ण पॅनल तयार करून या निवडणुकीत भाग घेण्याचे ठरवले आपले १९ उमेदवार  या निवडणुकीत सर्व शक्तीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे असे सांगितले. मुंबईतील तीन संचालकांनी या निवडणुकीत यापुर्वीही निवडून आल्यानंतर आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. संजय पाटील, जालिंदर सरोदे आणि सुभाष मोरे या उमेदवारांनी म्हणजेच माझी संचालकांनी परत या निवडणुकीत उडी घेतली आहे. आणि शिक्षक चळवळीचे शिक्षक भारतीचे कार्यकर्ते जगन्नाथ जाधव यांनी विद्यमान पॅनल तर्फे उमेदवारी अर्ज भरला आहे. नारायण राणे समर्थक राजु बंडगर म्हणजे भाजपाचे दुसरे पँनल यांनी अर्ज दाखल केला असे सुत्रांनी सांगितले . संघर्षाला सुरुवात झाली, हायटेक निवडणूक प्रचार होणार आहे. यासाठी शिवसेना, भाजपा, शिक्षक भारती या सर्वानी विद्यमान पँनल विरोधात सर्वसमावेशक पॅनल देऊ विद्यमान संचालक मंडळाला धक्का देऊन  आव्हान देण्याचे प्रयत्न केले आहे. आणि असे काही तरी भविष्यात घडणार याची कल्पना संचालक चंद्रकांत बाजीराव पाटील यांना असल्यामुळेच त्यांनी यापूर्वी तयारी करून विरोधातील उमेदवार फोडण्याचे प्रयत्न केले आणि ती चाल चांगली यशस्वीपणे केली. शिवसेनेचे मानले जाणारे श्रमिक विद्यालयाचे अजित चव्हाण आणि जगन्नाथ जाधव यांना समता पॅनल तर्फे उमेदवारी देऊन निवडणुकीत रंग भरला. चंद्रकांत बाजीराव पाटील यांनी बाजी मारली. या निवडणुकीत प्रत्येक पॅनलला विजयश्री खेचून आणण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करावी लागणार आहे कारण निवडणूक लढवणे कठीण असले तरी अवघड नाही असे प्रत्येक उमेदवाराला वाटते. खात्रीलायक गोटातून आर्थिक रसद पुरवठा करण्याची जबाबदारी काही वरीष्ठ नेत्यांनी केली आहे. शिक्षक आमदार कपिल पाटील यांचा आशीर्वाद आपल्या पॅनल ला आहे प्रत्यक्ष त्यांचा निवडणुकीत सहभागी नसला तरी वर्चस्व मात्र असणार आहे या निवडणुकीत मुंबईच्या मतदार संख्या व उमेदवारा मुळे पॅनलचे वर्चस्व मुंबई-ठाणे विभागांवर अवलंबून राहणार असल्याचे लक्षात येते. एकूण 19 उमेदवार संचालक पदावर येणार आहेत. 14 संचालक उमेदवारासाठी खुल्या गटातील असतील तर   पाच पदे राखीव आहेत. भटके-विमुक्त, ओबीसी या प्रवासासाठी एके एक जागा व महिला उमेदवारांसाठी 2 जागा राखीव आहेत.  दोन महिला उमेदवार महिला प्रवर्गातील असल्या तरी खुल्या प्रवर्गातही महिला उमेदवार देऊ शकतात यामुळे राखीव महिला दोन असल्या तरी संचालक पदी तीन-चार महिला उमेदवार येऊ शकतात अशी शक्यता आहे. परंतु तिकीट कोणाला द्यावे यासाठी संघर्ष सुरू आहे. आपले गॉडफादर म्हणजेच उच्च पदस्थ नेते यांच्याशी संपर्क साधून आपल्याला तिकीट मिळावे अशी प्रयत्नाचीपराकाष्टा उमेदवार करत आहे. कारण लवकरच मुंबई महानगरपालिका आणि त्यानंतर शिक्षक मतदार संघाची निवडणूक होणार आहे आणि संचालक पदाची निवडणूक ही त्याची प्रती निवडणूक आहे असेच चित्र आज निर्माण झाले. केवळ 29 हजार मतदार असलेल्या या निवडणुकीची रणधुमाळी आता लवकरच शिक्षकांना व राज्यातील जनतेला पाहायला मिळेल. विद्यमान पँनलचे अध्यक्ष चंद्रकांत बाजीराव पाटील यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता आमचा विजय पक्का आहे कारण आमचं कार्य आहे यामुळे शिक्षक आम्हाला भरघोस मतांनी निवडून देतील असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला, तर सुभाष मोरे यांनी सर्वसमावेशक पॅनल मुळे विद्यमान पँनलला जबरदस्त फटका बसेल हे तुम्ही पहा अशी भविष्यवाणी केली.  शिवनाथ दराडे हे सर्व समावेशक पॅनलशी चर्चा करत असले तरी त्यांनी पूर्ण ताकदीनिशी 23 उमेदवारी अर्ज दाखल केले. दोन महिला उमेदवार असतानाही त्यांनी  सुरक्षितेसाठी सहा महिलांना उभे केले व अर्ज अर्ज भरले. यामुळे त्यांची मागणी सर्व समावेशक पॅनलकडे असणारे आम्हाला जास्तीत जास्त उमेदवार द्या. अशी मागणी धरण्याची शक्यता आहे. सुभाष मोरे त्यांचे तीन उमेदवार माझी संचालक आणि इतर उमेदवार आम्हाला मिळाले पाहिजे अशी मागणी करत आहेत. सेना, भाजपा आणि राष्ट्रवादीची काय मागणी आहे आठ तारीख पर्यंत कळेल त्यामुळे सर्वसमावेशक पॅनलच्या एक जुटी बद्दल शंका घेण्यात येत आहे. संचालक किशोर पाटील यांच्या मते आम्ही केवळ निवडणुकी पुरते मतदारांशी संपर्क करत नाही तर आम्ही सतत शिक्षकांच्या संपर्कात असतो. सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को. आँपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे कार्य यामुळे आमचा विजय पक्का आहे असे सांगितले व आताचे सर्वसमावेशक पँनल केवळ निवडणुकीसाठी तयार होत आहे याची कल्पना शिक्षकांना असल्यामुळे संचालकपदी आमचे उमेदवार असतील अशी खात्री दिली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, भारतीय जनता पक्षाचे नेते अशिष शेलार शिक्षक आमदार कपिल पाटील हे नेते या निवडणुकीत जातीने लक्ष देऊन आहेत. आठ डिसेंबरला निवडणूक अर्ज मागे घेण्याची तारीख आहे त्यानंतरच किती उमेदवार रिंगणात राहतात हे कळणार आहे आणि निवडणूक अठरा डिसेंबर रोजी होत आहे. लवकरच पतसंस्थेच्या निवडणूकीत कोणाची पत किती आहे हे आपल्याला कळेलच पण निवडणुकीमुळे राजकारणाची पत मात्र खाली गेली आहे. कोणाचा दावा किती प्रत्यक्षात उतरत आहे त्यावरच शिक्षक मतदार संघाची आणि महापालिकेच्या निवडणुकीत कोणाचे वर्चस्व सिद्ध होईल हे लक्षात येईल.शिक्षक हा समाजातील महत्वपूर्ण घटक असल्याने व करोडो रुपयांचा आर्थिक व्यवहार असलेल्या या आगळ्यावेगळ्या निवडणूकिकडे सर्वच राजकीय धुरंदारांचे लक्ष राहिले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे