ब्रेकिंग

जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय धनगर जमातीच्या समस्यांचे समाधान होणार नाही — बलभीम माथेले


जेजुरी येथील तिसर्‍या धनगर जागृती परिषदेस पिंपरी चिंचवड,पुण्यातुन मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहणार

पिंपरी : मौर्य क्रांती संघाच्या वतीने जेजुरी येथे होणार्‍या तिसर्‍या धनगर जागृती परिषदेच्या निमित्ताने नुकतेच ज्ञानराज माध्यमिक शाळा कासारवाडी व जेतवन बुध्दविहार,वाल्हेकरवाडी येथे संपन्न झालेल्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरास शहरातील धनगर समाज बांधवाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

  याप्रसंगी मार्गदर्शन करताना मौर्य क्रांती संघाचे राज्य प्रभारी बलभीम माथेले सर म्हणाले की, जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय धनगर जमातीच्या समस्यांचे समाधान होणार नाही..त्यासाठी राष्ट्रव्यापी जनआंदोलन उभरावे लागेल.

  प्रशिक्षण शिबिराचे अध्यक्षस्थान ज्ञानराज माध्यमिक शाळेचे संस्थापक संजय शेंडगे सर यांनी भूषविले.शिबिराचे उदघाटन नगरसेविका सौ.आशाताई शेंडगे धायगुडे यांनी केले.प्रशिक्षण शिबिराचे सुत्रसंचालन पोपटराव खारतोडे यांनी केले.तर प्रास्ताविक डाॅ.बापुराव बंडगर यांनी केले.त्याप्रसंगी प्रमुख उपस्थितांमध्ये श्री गणेश पुजारी सर, दिपक भोजने,महावीर काळे,राहुल मदने, मंगेश पोटे अजित चौगुले दादा कोपनर संजय नायकवडे आदी उपस्थित होते.

      तिसर्‍या धनगर जागृती परिषदेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातून दि.१७ आक्टोबर पासून निघालेल्या परिवर्तन यात्रेचा जेजुरी येथे दि.२१ नोव्हें.रोजी समारोप होणार असल्याने या जागृती परिषदेस शहरातून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा समाज बांधवांनी यावेळी निर्धार व्यक्त केला

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे