धुळ्यात अवैधरीत्या बनावट मद्याची निर्मिती : तीन लाखांचा मुद्देमाल जप्त
दोन महिला व पुरूषांसह चौघांना अटक : धुळे शहर पोलिसांची कामगिरी
दोन महिला व पुरूषांसह चौघांना अटक : धुळे शहर पोलिसांची कामगिरी
धुळे : धुळे शहर पोलिसांनी अवैध मद्याची निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकत सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून मुख्य संशयीत पसार झाला आहे. पोलिसांनी देशी दारु बॉटल सिलिंगच्या दोन मशीन, बनावट देशी दारुने भरलेल्या बाटल्यांचे 22 खोके, 105 लिटर स्पिरीट, रीकाम्या बाटल्या, दोन मोटार सायकली, चार मोबाईल, 120 लिटर सुटी बनावट दारु व ती तयार करण्याकामी लागणारे रंगीत रसायन वगैरे साधने असा एकुण 3 लाख 27 हजार 286 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. धुळे शहरातील प्लॉट क्रमांक 13 मधील सुरतवाला बिल्डींगमधील कृष्णाई या घरात ही कारवाई करण्यात आली तर मुख्य सुत्रधार मयुर शार्दुल हा पसार झाला आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई
धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहा. निरीक्षक दादासाहेब पाटील, हवालदार विलास भामरे, पोहेकॉ मुक्तार मन्सुरी, हवालदार सतीश कोठावदे, मनीष सोनगिरे, प्रवीण पाटील, निलेश पोतदार, अविनाश कराड, तुषार मोरे, शकिर शेख, चालक सुभाष मोरे यांनी ही कारवाई केली.




