आपल खान्देश
अमळनेर तालुक्यात मुदत संपलेल्या दाखल्यावर दिले जाते संजय गांधी योजनेचे अनुदान! प्रहार अपंग संघटनेची मुख्यमंत्रीकडे तक्रार
अमळनेर तालुक्यात मुदत संपलेल्या दाखल्यावर दिले जाते संजय गांधी योजनेचे अनुदान! प्रहार अपंग संघटनेची मुख्यमंत्रीकडे तक्रार
अंमळनेर (प्रतिनिधी) दिव्यांगांना केंद्र शासन व राज्य शासन मिळून अनुदान प्रत्येक तालुक्याच्या तहसील मधील संजय गांधी योजनेअंतर्गत हे अनुदान लाभार्थींना थेट आपल्या बँक खात्यात जमा केले जात असते परंतु अमळनेर तहसील कार्यालयात गेली अनेक वर्षा पासून ज्या दिव्यांगांचे प्रमाणपत्राची मुदत गेल्या काही महिन्यांपूर्वी नव्हे तर चक्क काही वर्षांपूर्वी संपून गेली आहेत अश्या लाभार्थींना कोणतीही सूचना न देता आजही अश्या हस्तलिखित दाखल्यांवर सदरील शासकीय अनुदान वितरित केले जात असल्याची तक्रार प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश पवार यांनी थेट मुख्यमंत्री केली आहे. या बाबत सविस्तर माहिती की, दिव्यांगांना कोणतीही कायमस्वरूपी योजना घेतांना कायमस्वरूपी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे,शिवाय ज्या प्रमाणपत्राची मुदत ठराविक कालावधीसाठी आहे त्यांनाही अनुदान दिले जात आहे.
परंतु जे दिव्यांग ७०% च्या पुढे तीव्र दिव्यांग आहेत त्यांना मात्र तहसील कार्यालयात वारंवार आपले प्रकरण मंजूर झाले की नाही या साठी फेरी मारावी लागत असून एका बाजूने शासकीय अनुदानाची सर्रास उधळपट्टी केली जात आहे. मागील काही महिन्यांपूर्वी अमळनेर तहसील मधील संजय गांधी योजनेचे १३ बोगस लाभार्थी अपात्र करण्यात आले होते. १४ सप्टेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार नमूद कालावधीतच सदरील दाखले ग्राह्य धरावे असे आदेश असूनही या गोष्टींकडे कानाडोळा केला जात आहे.




