देश-विदेश

सोशल मिडीया अर्थिक व्यवहार व फसवणुक..!

सद्या सोशल मिडीया चा जमाना आहे. सोशल मिडीया वर भरपुर लोक सक्रिय आहेत. हि संख्या भारतामध्ये खुप आहे. भारतामध्ये सुमारे ५० कोटी पेक्षा जास्त लोक सोशल मिडीयाचा वापर करतात.

असो हा प्रश्न आजचा नाही परंतु आज एक वेगळ प्रश्न आहे, तो म्हणजे सोशल मिडीया ; अर्थिक व्यवहार व फसवणुक.

सोशल मिडीया, जसे फेसबुक, ट्वीटर व इंस्टाग्राम या सारखे अनेक प्रकार आहेत. त्याद्वारे आपण हजारो लोकांशी जोडले जातो. सोशल मिडीया हे माहिती व संप्रेषणासह मनोरंजनाचे हि साधन आहे. परंतु सद्या सोशल मिडीया द्वारे लोकांची अर्थिक फसवणुक मोठ्या प्रमाणात होत आहे.

अर्थिक फसवणुक कशी केली जाते याचे काल्पणिक उदाहरण :

सोशल मिडीया म्हणजेच फेसबुक व ट्वीटर या माध्यमांवर एका व्यक्तीचे मोठ्या प्रमाणावर मित्र परिवार व अनुयायी (Followers) असतात. तो सोशल मिडीया वरील इसम रोज अनेक प्रकारच्या पोस्ट द्वारे लोकांची मने जिंकतो; त्यात धार्मिक, राजकिय, अर्थिक, कायदेशीर व सामाजिक विषय असतात.

त्याचे सोशल मिडीया वरील लेख व पोस्ट त्याच्या मित्र परिवार व अनुयायांना इतक्या आवडतात कि त्याच्यावर लोकांचा विश्वास निर्माण होतो.

लोक विश्वासात इतके अध होतात कि त्याची सर्व सर्व गोष्ठी ख-या वाटु लागतात. तो संबंधीत सोशल मिडीया वरील प्रसिध्द इसमाच्या मनामध्ये लालसा निर्माण होते. तो विचार करतो आपल्यावर इतक्या लोकांचा विश्वास आहे. याबध्दल आपण काही तरी अर्थिक व्यवहार केला पाहिजे.

काही दिवसांनंतर तो सोशल मिडीया वरील इसम त्याच्या मित्र परिवारातील लोकांना एक संदेश देतो,

कि “आपण माझ्या द्वारे ठरावीक रक्कम गुंतवली तर ठरावीक दिवसांत आपल्याला मोठा परतावा मिळेल. सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवत त्याच्या योजनेमध्ये ठरावीक रक्कम गुंतवणुक करतात, ठरावीक दिवसानंतर परतफेडीचा दिवस येतो. परतफेडी वेळी तो इसम गुंतवणुकदारांना म्हणतो तुमची रक्कम बुडाली आहे. मी काही परतफेड करु शकत नाही. काही काळासाठी सदर इसम आपले खात बंद ठेवतो.

समाजात काही भोळे भाबडे लोक असतात कि जे प्रत्येकावर विश्वास ठेवतात शेवटी त्यांच्या विश्वासाचा घात होतो.

त्यानंतर गुंतवणुकदार त्याच्या विरुध्द भारतीय दंड संहिता ४२० कलम अंतर्गत तक्रार दाखल करतात व त्या भामट्या इसमास अटक होते. हे झाले गुतवणुकीतील अर्थिक फसवणुकीचे उदाहरण काही लोक आपल्या मित्रयादीतील व विचारातील लोकांना भावणीक करुन अर्थिक फसवणुक करतात, जसे एक इसम एका राजकिय पक्ष व धार्मिक विचारांशी निगडीत असतो तो सोशल मिडीया वर दररोज सक्रिय असतो, हजारो मित्र असतात.

एक दिवशी काय होते तो सदर इसमाच्या विरुध्द विरोधी पक्षातील लोक तक्रार दाखल करतात, त्याला धमकी देतात. सदर इसमाची अर्थिक परिस्थिती हालाकीची आहे. यामुळे त्याला पोलिस व खटले यांकरिता पैसा लागतो असे लोकांना सांगतो.

यात त्या आरोपीचा एक मित्र एक पोस्ट करतो, आपल्या धर्मवादी बंधुला अटक झाली आहे, जामिन व कायदेशीर बाबींची पुर्तता करण्यासाठी पैशे हवे आहेत. कृपया आपल्या धर्मवादी बंधुला मदत करा.अशा प्रकारे बरेच लोक मदत करतात ,परंतु काही जनांना एक गुपीत समजते कि हा धर्मवादी इसमाला अटक झाली नव्हती तो सदर व्यक्ती ची माफी मागुण दोषमुक्त झाला आहे. हे सर्व कळताच सर्व लोक त्याच्यावर नाराज होतात, व तो धर्मवादी असल्याचे ढोंग करत पैसे जमावणारा व त्याचा मित्र लंपास होतो.

अशा प्रकारे सोशल मिडीया असो किंवा समाजात हि इतरत्र अशे बोगस लोक असतात कि जे अर्थिक व्यवहार व फसवणुक करतात. आपल्याला त्या सर्व भावनिक कारस्थाना बळी पडले नाही पाहिजे. मदत करताना त्या व्यक्ती ची विश्वसनियता व खरेपणा पाहत जा. नाही तर प्रसिध्दी व धर्माच्या नावे कमाई करणारे आहेत. यामुळे उगाच आपला धर्म बदनाम होतो याची मला खंत आहे.

तात्पर्य सोशल मिडीयाचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. वापर करताना विवेकबुध्दी वापरावी नाही तर अशी फसवणुक व विश्वासघात होतो.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे