आरोग्य व शिक्षण

एकाच फोनवरून अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास शक्य’, जळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अनोख्या ॲपचं उद्घाटन

कोव्हिडमुळे येत्या वर्षीही शिक्षण ऑनलाईन राहील असं दिसत असताना, जळगाव जिल्हा प्रशासन आणि ‘वोपा’ या सामाजिक संस्थेकडून महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक अभ्यासक्रम देणाऱ्या ‘व्ही स्कूल’ या प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले.

पुणे : कोव्हिडमुळे येत्या वर्षीही शिक्षण ऑनलाईन राहील असं दिसत असताना, जळगाव जिल्हा प्रशासन आणि ‘वोपा’ या सामाजिक संस्थेकडून महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक अभ्यासक्रम देणाऱ्या ‘व्ही स्कूल’ या प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. ऑनलाईन पार पडलेल्या या कार्यक्रमात जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन पाटील, प्रसिद्ध सिनेअभिनेते ललित प्रभाकर, सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका दीपा देशमुख, अभिनेते पुष्कराज चिरपुटकर, नाशिक शिक्षण विभाग उपसंचालक उपासनी उपस्थित होते

एकाच फोनवरून अनेक विद्यार्थी अभ्यास करू शकणार”

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण मिळवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. इंटरनेटपासून ते अगदी अभ्यासासाठी वेळेत फोन मिळेपर्यंत अनेक गोष्टी यामध्ये असतात. या साऱ्याचा विचार करून ‘वोपा’ने ‘व्ही-स्कूल’ या ॲपची निर्मिती केली आहे. यामध्ये मल्टीमिडीया पद्धतीने अभ्यासक्रम उपलब्ध केला गेलाय. अभ्यासाचे ऑफलाईन डाऊनलोडिंग शक्य आहे. तसेच, यात एकाच फोनवरून अनेक विद्यार्थी अभ्यास करू शकतील. यासाठी शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी जळगाव जिल्ह्यातील शिक्षक आणि प्रशासन सहकार्य करणार आहेत.

ॲपमधील अभ्यासक्रम निर्मितीसाठी जळगाव जिल्हा प्रशासनाचा पुढाकार

जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी जळगाव जिल्हा या शैक्षणिक ॲपमध्ये संपूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली. यानिमित्ताने उर्दू भाषेतील शैक्षणिक साहित्य ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यात येईल, असेही राऊत यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले.

हे ॲप कसं डाऊनलोड करणार?

वोपा संस्थेच्या http://edu.vopa.in/learn/ या वेबसाईटला भेट देऊन हे ॲप डाऊनलोड करता येणार आहे.

ॲपची वैशिष्ट्ये

पीडीएफ, ऑडिओ, पीपीटी, इमेजेस, जीआयएफ इमेजेस, व्हिडीओ, गुगल फॉर्म अशा विविध माध्यमांचा वापर करून शिक्षण

  • कमी इंटरनेटमध्ये ऑनलाइन अभ्यास शक्य
  • अभ्यासाचे ऑफलाईन डाऊनलोडिंग करता येते
  • एका ऍपवरून 4 विविध इयत्तांचे विद्यार्थी अभ्यास करू शकतात.
  • विद्यार्थ्यांनी किती वेळ अभ्यास केला, याची नोंद होते.
  • कोणत्याही जाहिराती नाहीत.
  • आकर्षक व विचार करून डिझाईन केलेली रंगसंगती
  • अभ्यास एकाच ठिकाणी सेव्ह राहतो, व हरवत नाही
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे