महाराष्ट्र

“सहनशीलतेचा अंत पाहू नका”, राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

“मुंबईकरांचे रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा सर्वांसाठी अत्यंत तातडीनं सुरू करावी, अशी मागणी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे करत आहे.”

आवाहन राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता पुन्हा काही प्रमाणात वाढू लागली आहे. त्यामुळे राज्य सरकारने निर्बंध आणखी शिथिल न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण मुंबईत मात्र लोकल बंद असल्याने लाखो मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेकांना लोकल प्रवास करता येत नसल्याने नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. तर इतर मार्गांनी प्रवासाचा खर्च वाढला आहे, तसेच वेळही जास्त लागत आहे. यामुळे सामान्यांसाठी लोकल सुरू करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. सामान्यांचा संतापही आता वाढू लागला आहे.

https://twitter.com/RajThackeray/status/1418109185472962563?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1418109185472962563%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.maxmaharashtra.com%2Fnews-update%2Fstart-local-for-people-who-have-taken-2-doses-of-vaccine-in-mumbai-raj-thackrey-958875

या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मोठी मागणी केली आहे. कोरोनावरील लसीचे दोन ड़ोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे