“स्तुत्य उपक्रम”
माणदेशी कोहिनूर ,मुंबई सहा. आयकर आयुक्त डॉ. सचिनजी मोटे(IRS) साहेबांच्या सामाजिक कार्यात खांद्याला -खांदा देऊन काम करणाऱ्या, त्यांच्या अर्धांगिनी, आमच्या मार्गदर्शिका मा. सौ.विद्याताई मोटे (ताईसाहेब) यांचा आज वाढदिवस.
वास्तविक आज उच्च पदस्थ अधिकारी यांची पत्नी म्हणून पंचतारांकित हॉटेल मध्ये वाढदिवसाचे सेलिब्रेशन व्हायला हवे होते.

पण कोणत्याही अविर्भावात न राहता त्यांनी आज वाढदिवसाचे औचित्य साधत आजचा दिवस “वात्सल्य अनाथालय ट्रस्ट मुंबई ” येथे अनाथ मुलांशी व्यतित केला. अनाथ मुलांच्या व्यथा जाणून घेतल्या . साध्य फाउंडेशनच्या वतीने अनाथ मुलांना शालेय साहित्याबरोबर ,आहाराचे साहित्य ट्रस्टकडे सुपूर्द केले.
पण म्हणतात ना माणसं पदाने मोठी असली तरी सामान्यांशी त्यांची नाळ घट्ट असते . ही माणसं इमाने-इतमाणे सेवा करत सकल जणांशी आधार असतात.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा