ब्रेकिंग

पाचोरा शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याची तसेच स्मारकांची दररोज पाचोरा नगरपालिकेने योग्य साफसफाई ठेवा.

गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेल ची थेट नजर असणार आहे..

पाचोरा शहरातील महापुरुषांच्या स्मारकांची योग्य वेळी साफसफाई व परिसर स्वच्छ ठेवा अशी मागणीचे सोशल मीडियामार्फत मागणी करण्यात आली असून नागरिकांनाही प्रतिक्रिया देत समर्थन केले असून आता पाचोरा नगरपरिषद कश्या प्रकारे लक्ष ठेवते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

समाज माध्यमातून आलेली पोस्ट खालील प्रमाणे..

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तसेच क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तसेच संभाजी महाराज यांचे स्मारक व इतर कुठल्या ही महापुरुषांच्या स्मारक असतील तर या स्मारकांना पाचोरा नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दररोज साफसफाई करून स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे तरच महापुरुषांचे विचार हे तुम्हा आम्हा सर्व सामान्य कार्यकर्त्यांमध्ये रुजणार आहे पाचोरा नगरपालिका हद्दीतील ज्या ज्या कर्मचाऱ्यांना या पुतळ्याची व स्मारक ची जबाबदारी दिली आहे त्या कर्मचाऱ्यांनी कुठलही कामात दिरंगाई न करता दररोज संबंधित पुतळ्यांची साफसफाई व पुतळ्यावर तसेज स्मारक फोटोवर जमलेली धूर ही ताबडतोब साफ करावे कुठल्याही पुतळ्यावर घाणीचे साम्राज्य दिसले तर पाचोरा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची खैर नाही पाचोरा नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी यांच्या लक्षात आणून देतो की पाचोरा शहरातले महापुरुषांचे सर्व स्मारक व सर्व पुतळे ताबडतोब क्लीनिंग करावे व रेगुलर यांचे साफसफाई ठेवावीत.

तसेच स्मारक च्या आजू बाजूला अनधिकृत पार्किंग व काही दारुड्या लोकांचा जो घोळका जमा होतो त्यांच्यावरील कडक कारवाई करण्यात यावी स्मारकाच्या आजूबाजूला अतिक्रमण करणारे तसेच धूम्रपान करणारे यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी सदरचे स्मारक आणि पुतळे रेगुलर साफसफाई व्हावे फक्त जयंतीला आणि कुठल्या कार्यक्रमालाच सफाई व्हायला नको तर दररोज सफाई करण्यात यावी ज्या कर्मचाऱ्यांची या स्मारकांसाठी नेमणूक झाली आहे त्या कर्मचाऱ्यांनी जातीने लक्ष द्यावे सदर स्मारक च्या ठिकाणी कर्मचारी न आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी.

अन्यथा गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनल चा कॅमेरा पाचोरा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर लागले पाचोरा शहरातील सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्या शहराचे साफसफाई ठेवण्यासाठी प्रयत्न करा चुकीच्या दिसेल तिथे फोटो काढा आणि गर्जा महाराष्ट्राला पाठवा नक्कीच गर्जा महाराष्ट्र न्यूज या गोष्टीला प्राधान्य देईल.

@अनिल महाजन मुख्य संपादक गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनल*

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे