आपल खान्देश

पाचोरा | शिंदे इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याला “जिल्हा युवक पुरस्कार 2026” प्रदान..

 

पाचोरा | पाचोऱ्यातील शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च, येथील डी. फार्मसी द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी कमलेश सोनवणे याला सन 2026 चा मानाचा “जिल्हा युवक पुरस्कार” प्रदान करण्यात आला आहे. सामाजिक, शैक्षणिक व युवक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला.

कमलेश सोनवणे याने युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी, जनजागृती तसेच विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत उत्कृष्ट कार्य केले आहे. त्याच्या या यशामुळे संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, संचालक, प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कमलेश सोनवणे याचे अभिनंदन करून त्याच्य पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच विद्यार्थ्याच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे