महाराष्ट्र

चौंडी हे आहिल्यादेवी यांचे जन्म स्थान असून समाजाचे धार्मिक स्थळ आहे त्याला राजकीय अड्डा बनवू नका!

चौंडी हे आहिल्यादेवी यांचे जन्म स्थान असून समाजाचे धार्मिक स्थळ आहे त्याला राजकीय अड्डा बनवू नका!

-सुनील वाघमोडे.

बांधवांनो ३१ मे म्हणजे आपल्या सर्वांचा आनंद उत्सव आहिल्यादेवी यांच्या जयंती दिवशी शुभेच्छाची लाखोली वाहत असतो प्रत्येक समाज बांधव सामाजिक व धार्मिक विविध सांस्कृतिक कार्यक्रम ठेऊन व्याख्यानाच्या माध्यमातून आहिल्यादेवी यांचे कर्तृत्व हे घरा घरा पर्यत पोहचवण्याचे काम समाजात वर्षानुवर्षे चालू आहे आणि ते केलं ही पाहिजे आपल्या मातेचा इतिहास जगासमोर मांडला पाहिजे परंतु गेल्या वर्षी पासून या कोरोनाच्या जगतीक महामारी च्या काळात आपण आपल्या मातेची जयंती ही शासकीय नियमांचं पालन करून आपापल्या घरी गावामध्ये साजरी करून प्रशासनाला सहकार्य करणे ही काळाची गरज बनली आहे.

परंतु समाजातील काही सोंगाडे राजकीय नेते दलालाची भूमिका बजावताना दिसत आहेत ते फक्त सामजिक धार्मिक गोष्टी तुन स्वतःचा राजकीय फायदा व कोणत्या तरी राजकीय पक्षाची हुजरेगिरी करून समाजाला फसवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत यातून समाजाच नुकसान तर करत आहेतच परंतु जी नवीन पिढी बरबाद करण्याचं महा पाप ते करत आहेत हे आपणाला ला या आगोदर अखेच्या लढ्यात दिसून आले आहे अखेचा लढा आरक्षण साठी होता की राजकीय स्वार्थासाठी होता हे अजून तरी त्या आयोजक नियोजक यांनी सर्वसामान्य बांधवांना समजून दिले नाही लोकांची फक्त दिशा भूल करून आपला हेतू साध्य करायचा आणि खोटं नाट बोलून तरुण पिढीला भुरळ घालायची आणि एखादा मुद्दा घेऊन राजकारण करायचा आणि सामाजिक कार्यक्रमात वेत्येय आणून खोटी प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करायचा आपल्याच समाजातील नेत्यांच खच्चीकरण करून पक्ष श्रेष्ठीना खुश करण्यासाठी समाजाची ओट बँक प्रामुख्याने माझ्या मागे आहे असे दाखवुन काहीतरी चिरीमिरी पदरात पाडून घ्यायच या पेक्षा वेगळ चित्र पहायला मिळत नाही

 

म्हणूनच त्या समाजाचे कैवारी समजणाऱ्या नेत्यांना कळकळीची विनंती आहे की तुम्हाला राजकारण जे करायचं ते करा पण स्वतःच्या हिंम्मतीवर राजकीय कौसल्या वर करा समाजाच्या सामाजिक धार्मिक कार्यक्रमत तरी तुमचं राजकारण बाजूला ठेवा आणि मातेच्या जयंती दिवशी तरी आहिल्यादेवी यांची जयंती ही आनंद उत्सव साजरा करा नाहीतर तुमच्या नादान पणात आजपर्यंत समाजाची फरपट होत आहे मूळ मुद्दा बाजूला राहतो आणि त्याला राजकीय स्वरूप प्राप्त होते त्यामुळे समाजाची अवस्था बिकट होताना दिसत आहे.

आहिल्यादेवी यांचे जन्मस्थान चौंडी हे गाव आपल्या साठी आपल्या समाजासाठी तीर्थक्षेत्र आहे याचं पवित्र रहाव व सामाजिक धार्मिक ठिकाण हे राजकीय अड्डा करू नये मापक अपेक्षा

सुनिल वाघमोडे

संपर्क – ९७७३७५२४४७

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे